साखरवाडीत मुस्लिम व मराठा समाजाचे एकात्मतेचे दर्शन
मुस्लिम समाजाकडून मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा
प्रतिनिधी दादा जाधव
जालन्यातील मराठा समाजातील पुरुष व महिला आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचाराचा निषेधार्थ जाहीर निषेध म्हणून मराठा आरक्षणासाठी सातारा जिल्ह्यासह साखरवाडीत कडकडीत बंद पाळण्यात आला होता
मराठा आरक्षणासाठी आम्ही कायम मराठा समाजा सोबत आहोत यासाठी मराठा आरक्षणासाठी पाठिंब्याचे निवेदन मुस्लिम जमात साखरवाडी ता. फलटण, जि. सातारा, यांच्यावतीने आज साखरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांना दिले आहे
यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने शौकत कच्छी,फिरोज शेख,अरिफभाई मनेर,अन्वर महात उपस्थित होते

Post a Comment
0 Comments