Type Here to Get Search Results !

सकल मराठा समाज व मराठी क्रांती मोर्चा यांच्या वतीने साखरवाडी बंद ठेवण्याचे साखरवाडी चे सरपंच ग्रामविकास अधिकारी व फलटण पोलीस निरीक्षक यांना निवेदन

 सकल मराठा समाज व मराठी क्रांती मोर्चा यांच्या वतीने साखरवाडी बंद ठेवण्याचे साखरवाडी चे सरपंच ग्रामविकास अधिकारी व फलटण पोलीस निरीक्षक  यांना निवेदन





प्रतिनिधी दादा जाधव 

       

         जालन्यातील मराठा समाजातील पुरुष व महिला आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचाराचा निषेधार्थ जाहीर निषेध म्हणून उद्या सोमवार दि. ४ सप्टेंबर २०२३ रोजी साखरवाडी बंद ची हाक देण्यात आली आहे

सकल मराठा समाज व मराठी क्रांती मोर्चा साखरवाडी यांच्या वतीने साखरवाडी बंद ठेवण्याचे निवेदन साखरवाडी चे सरपंच,ग्रामविकास अधिकारी व फलटण पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांना देण्यात आले आहे

      हे साखरवाडीतील मराठा समाजाच्या बांधवांच्या वतीने निवेदन देताना साखरवाडी गावचे तंटामुक्ती उपाध्यक्ष शैलेश इंगळे,युवराज भोसले, महेश भोसले व विकी राजेंद्र भोसले उपस्थित होते 

       तरी साखरवाडी अत्यावश्यक सेवा वगळून बंद ठेवण्याचे आवाहन सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने केले आहे

Post a Comment

0 Comments