Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र भुषण डाॅ.ति.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीवर्षा निमित्त महाबळेश्वर येथे स्वच्छता अभियान......

 महाराष्ट्र भुषण डाॅ.ति.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीवर्षा निमित्त महाबळेश्वर येथे स्वच्छता अभियान......

 


प्रतिनिधी /राहुल शेलार 

महाबळेश्वर,(सातारा)




डाॅ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा,ता.अलिबाग,जि.रायगड यांच्या वतीने व डाॅ.श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी याच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भुषण डाॅ.ति.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीवर्षा निमित्त वर्षभर करण्यात येणाऱ्या दत्तक घेतलेल्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे.  यावेळी महाबळेश्वर शहरातील पंचायत समिती, महाबळेश्वर नगरपरिषद रोड, श्रीक्षेत्रमहाबळेश्वर रोड ते काळे वस्ती पर्यंत वर्षभर दर महिन्याच्या पहिल्या रविवारी स्वच्छता मोहीम करण्यात येणार आहे.  दि.३/०९/२०२३ रोजी श्री समर्थ बैठकीतील  ३४ सदस्यांनी सकाळी ७:३० ते ९:३० वाजेपर्यंत पंचायत समिती महाबळेश्वर शहरातील शासकीय दूध डेअरी ते क्षेत्र महाबळेश्वर रोड काळे वस्तीपर्यंत समिती श्री सदस्यांकडून स्वच्छता करण्यात आली. अंदाजे ३० किलो इतका कचरा गोळा करण्यात आला. वर्षभर स्वच्छता टप्प्यां,टप्पान करण्यात येणार आहे. डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून सातत्याने समाजपयोगी उपक्रम राज्यभर राबविले जातात.त्यात प्रामुख्याने वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबीर,दाखले वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप,अंध व मुक बधीर विद्यार्थ्यांना मदत, उद्योजकता व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर, पाणपोई, बस थांबे, अपघातग्रस्तांना मदत, या सारखे अनेक उपक्रम डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविले जातात. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments