बांबू लागवडी बाबत एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन
प्रतिनिधी /फलटण
फलटण दि. १७ बांबू लागवड कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य संस्था सदस्य व माजी अध्यक्ष कृषी मूल्य आयोग पाशाजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन फलटण पंचायत समिती सभागृहात करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, यांच्यासह तालुक्यातील ग्रामसेवक व कृषी सहाय्यक, वन विभाग अधिकारी, सरपंच, उपसरपंच व विविध विभागाचे क्षेत्रीय अधिकारी या दिवशी कार्यशाळेत उपस्थित होते. आत्ता सध्या पृथ्वीवर तापमान वाढीचे मोठे संकट आलेले आहे. आगामी काही वर्षांमध्ये जागतिक तापमान वाढीचे भयानक दुष्परिणाम आपल्या सगळ्यांना पहावया मिळत आहेत. आज पर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी इंजिन व यंत्र सामुग्रीचे शोध लावले आहेत. परंतु प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन बनवण्याचा शोध अजून कोणीही लावू शकले नाही. पृथ्वीवर फक्त विविध झाडेच प्राणवायू तयार करू शकतात. या सोप्या भाषेत सांगायचे झाले तर प्राणवायू तयार करण्याचा कारखाना म्हणजे झाडेच आहे. असे मत पाशाजी पटेल यांनी व्यक्त केले.
केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना आपण सर्वजण राबवत आहे. पण जर आपल्या ऑक्सिजन मिळाला नाही. बांबू लागवड योजना सोडल्यास दुसऱ्या कोणत्याही योजनेतून ऑक्सिजन मिळणार नाही या योजनेचा आर्थिक फायदा तसेच अनुदान व नैसर्गिक समतोल तसेच शेकडो वस्तू निर्मितीसाठी ही फायदा होणार आहे. भूतलावर असलेली मानव जात वाचवण्यासाठी ही ऑक्सिजन सारख्या प्राणवायू निर्मितीचे काम होणार आहे. त्यामुळे जर आपल्याला पुढील संकटे टाळायची असतील तर मनुष्य जातीचा मित्र म्हणून बांबू झाड आहे. २०१७ नंतर डिझेल पेट्रोलचे पंप बंद होणार आहे . माणूस जातीने प्राणवायू तयार कारखाना म्हणजे बांबू ची झाडे आहे. माणसाच्या संशोधना इंजनानेच आपला मोठा घात घेतला आहे. असे मत यावेळी पाशा पटेल यांनी व्यक्त केले.
फलटण तालुक्याचे सुमारे ८८ हजार क्षेत्रफळ आहे. जर आपल्याला निसर्गाचा समतोल साधायचा असेल तर ते ३३टक्के वनराई असणे आवश्यक आहे. आणि फलटण तालुक्याचे टार्गेट आहे. फक्त ९०० हेक्टर आणि सद्यस्थितीत फक्त १ हेक्टर लागवड आहे. याचे दुष्परिणाम पाहता नुकतेच लिबिया या आजारामुळे ५० हजार माणसांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचे महत्त्वाचे कारण आहे की निसर्गाचा समतोल विस्कळीत इतर +देशांमध्ये ३० मजली इमारती अति पाऊसामुळे पडले आहे. एका ठिकाणी प्रतिवर्षे पेक्षा १२०० पट जास्त पाऊस पडत आहे. या दोन वर्षा ढगफुटी सारखा पाऊस आहे नॉर्मल पाऊसच पडत नाहीये पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे या सर्व गोष्टी बिघडत आहेत. जर असेच आपण करत राहिले तर २०५० आली मानव जात या पृथ्वीवर राहणार नाही कोणीही माणूस ठरवून जन्माला येत नाही आता संबंध मानव जात संकटात आहे २०५० ला समुद्रा किनाऱ्या लगतचे शहरे संपूर्ण बुडणार आहे. तापमान वाढीची युग आता संपले आहे. आता आपण होरफळून मारणार आहे. अजून जगामध्ये ऑक्सिजन तयार करण्याची मशीन तर तयार झाली नाही. ऑक्सिजन हा फक्त झाडे तयार करतात अजूनही माणूस ऑक्सिजन तयार करू शकत नाही माणूस ऑक्सिजन खातो आणि कार्बन सोडतो १ लिटर पेट्रोल जाळले की ३ किलो कार्बन तयार होत आहे. कोरोणा सारख्या महा मारी रोगासाठी ऑक्सिजन ची किंमत आपण सर्व जगाने अनुभवले आहे. असेही यावेळी पाशाजी पटेल यांनी व्यक्त केली
गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी प्रास्ताविक केले तर तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी आभार मानले

Post a Comment
0 Comments