पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली अमर जवान संदीप सपकाळ यांच्या कुटुंबीयांची भेट
प्रतिनिधी / सातारा
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी डिगेवाडी ता. पाटण येथील अमर जवान संदीप सपकाळ यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच अमर जवान संदीप सपकाळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अमर जवान संदीप सपकाळ यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थ उपस्थित होते
यावेळी पालकमंत्री श्री देसाई यांनी कोणतीही मदत लागल्यास थेट संपर्क करावा असे सांगितले. तसेच अमर जवान संदीप सपकाळ यांच्या पत्नी, मुली व त्यांचे भाऊ यांची स्वतः आस्थेने विचारपूस केली.

Post a Comment
0 Comments