Type Here to Get Search Results !

फलटण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा

 फलटण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा



प्रतिनिधी फलटण ग्रामीण 

दादा जाधव 

         

        फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित काॅलेज आॅफ इंजिनिअरिंग फलटण येथे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया फलटण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया चे विश्वस्त श्री. विजय देवी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर व योग्य नियोजन करून यशस्वी अभियंता कसे व्हावे, अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी कौशल्य विकसित करुन नवीन नवीन गोष्टी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले


    बुद्धीमत्तेचा वापर क्रिएटिव्ह गोष्टी करण्यासाठी करावा

    यावेळी बोलताना श्री. विजय देवी यांनी विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं शक्य नसते म्हणून डायरीचा वापर करावा व सर्व लहान मोठ्या गोष्टींची नोंद ठेऊन बुद्धी चा वापर इतर क्रियेटीव्ह गोष्टी करण्यासाठी करावा असे आवाहन केले. प्रात्यक्षिकांवरती विशेष लक्ष देऊन कौशल्य विकसित करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

       यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ नरेंद्र नार्वे, लायन्स क्लब चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एम.जे.एफ.लायन भोजराज नाईक निंबाळकर, बिल्डर्स असोसिएशन फलटणचे अध्यक्ष किरण दंडीले, राजीव नाईक निंबाळकर तसेच बिल्डर्स असोसिएशन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

          या कार्यक्रमासाठी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ नरेंद्र नार्वे यांनी बिल्डर्स असोसिएशन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारे विविध उपक्रम राबविण्यात यावेत असे आवाहन केले. भोजराज नाईक निंबाळकर यांनी मार्गदर्शन करताना बिल्डर्स असोसिएशन चे काम चांगले चालले असल्याबद्दल बिल्डर्स असोसिएशन चे अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी यांचे कौतुक केले व सर्व अभियंत्यांना भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा आदर्श घेऊन काम करा व त्यांच्या सारखी कामाची गुणवत्ता राखा असे आवाहन केले


प्रा.चंद्रकांत गोरड यांनी सुत्रसंचलन केले व प्रा.धनश्री भोईटे यांनी आभार प्रदर्शन केले

Post a Comment

0 Comments