Type Here to Get Search Results !

स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची धडाकेबाज कारवाई

 स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची धडाकेबाज कारवाई


फलटण/वैभव जगताप 

श्री.समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील घोरपडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील विश्वास शिंगाडे यांच्या अधिपत्याखाली एक तपास पथक तयार केले होते 

दि. ३१/८/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वासनीय बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त झाली की पोलीस अभिलेखा वरील आरोपी महेश उर्फ म्हावडया मंगेश काळे यांचा कोरेगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ३०३/२०२३भारतीय दंड विधान क्रमांक ३९७,३९५,३९४,४५७,३८० या गुन्ह्यामध्ये सहभागी असून तो फलटण शहरात वावरत आहे तसेच नमूद आरोपी अत्यंत हुशार असून तो गुन्ह्याच्या तपासकामी मिळून येत नव्हता त्याच्या गुन्हेगारी पद्धतीचा अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षक पतंगराव पाटील, विश्वास शिंगाडे व त्यांच्या तपास पथकाने नाना पाटील चौक फलटण परिसरात सापळा लावून आरोपी महेश् उर्फ म्हावडया मावळ्या मंगेश काळे वय २१ वर्षे राहणार विसापूर ता. खटाव. जि. सातारा यास त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले त्याच्याकडे कोरेगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ३०३/२०२३भारतीय दंड विधान क्रमांक ३९४,४५७,३८० या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्याने त्याचे साथीदार ऋतुराज भाऊज्या शिंदे राहणार खातगुण ता.खटाव जि. सातारा, कोहिनूर जाकिर काळे राहणार मोळ ता. खटाव जि. सातारा वंदेक लक्ष्मण शिंदे, राजश्री वंदेक शिंदे राहणार विसापूर ता. खटाव जि. सातारा अभय काळे राहणार मोळ ता. खटाव जि. सातारा अतिक्रमण काळे राहणार खाद्गुण ता. खटाव जि. सातारा केला असल्याचे सांगितल्याने महेश उर्फ म्हावडया मंगेश काळे नमूद गुन्ह्यात अटक करून त्यास ६ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे व ऋतुराज भाज्या शिंदे यास अटक करून त्याची ५ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे तसेच नमूद गुन्हा आरोपींनी केला असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने गुन्ह्यास भारतीय दंड विधान क्रमांक ३९५, ३९७ ही वाढीव कलमे लावण्यात आलेली आहेत पोलीस कोठडी मुदतीत अटक आरोपींच्याकडून नमूद गुन्हातील चोरीस गेलेल्या मुद्देमाला पैकी ७७,५००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने गुन्ह्यात वापरलेलली मोटरसायकल हस्तगत केली गेली तसेच आणखी १५ गुन्ह्यातील एकूण ६६तोळे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने असा एकूण चालू बाजारभावाप्रमाणे ४०,१०,०००/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून नमूद अरोपिंच्याकडून १ दरोडा १ जबरी चोरी १४ घरपोडीचे गुन्हे असे एकूण १६ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत माहे नोव्हेंबर २०२२ पासून दरोडा जबरी चोरी घरपोडी मोटरसायकल चोरी इतर चोरी असे एकूण ६७ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणलेले असून नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यापैकी २३५ तोळे सोने (सव्वा दोन किलो) असा एकूण १,८२,९६,८३०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर साहेब सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र मोरे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील पोलीस अंमलदार तानाजी माने, सुधीर बनकर विश्वासनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संतोष सपकाळ संजय शिर्के, विजय कांबळे,साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, सचिन साळुंखे, अमोल माने, मुनीर मुल्ला, अजित करणे, सनी आवटे, अमृत कर्पे, पंकज बेसके, हसन तडवी, राकेश खांडके, राजू कांबळे, स्वप्नील माने, शिवाजी भिसे, मनोज जाधव, प्रवीण कांबळे, स्वप्नील दौंड,केतन शिंदे, धीरज महाडिक, मोहसीन मोमीन, मयूर देशमुख, परशुराम वाघमारे, दलजीत जगदाळे ,दिपाली यादव,सौजन्या मोरे, शकुंतला सणस, आदिक वीर, अनुराधा सणस, मोनाली पवार,सायबर विभागाचे अमित झेंडे, अजित जाधव, यांनी सदरची कारवाई केलेली असून कारवाईस सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री.समीर शेख पोलीस अध्यक्ष सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे

Post a Comment

0 Comments