श्रीक्षेत्र महाबळेश्वर परिसरात बिबट्याचे दर्शन
प्रतिनिधी /महाबळेश्वर
महाबळेश्वरहुन श्रीक्षेत्र महाबळेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बिबट्या फिरत असताना क्षेत्र महाबळेश्वर मधील नागरिकांना दिसला. बिबट्याच्या वावरामुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे.
महाबळेश्वरला सदाहरित घनदाट जंगलाचा वेढा आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणावर लहान-मोठे प्राणी फिरताना दिसून येतात. अलीकडे या प्राण्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. यामध्ये बिबट्यासारखे हिंस्त्र प्राणीही आहेत. महाबळेश्वरहुन श्रीक्षेत्र महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी एक बिबट्या फिरताना दिसून आला. श्रीक्षेत्र महाबळेश्वर गावांमधील सुधाकर आवकिरकर यांनी फोटो काढला तर सुनिता कांबळे यांनी व्हिडिओ काढला आहे. महाबळेश्वरहुन श्रीक्षेत्र महाबळेश्वर रहदारीच्या रस्त्यावर बिबटया फिरताना आढळल्याने या भागातील नागरी वस्तीमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.


Post a Comment
0 Comments