Type Here to Get Search Results !

कराड शहर पोलिसांची दमदार कामगिरी

 कराड शहर पोलिसांची दमदार कामगिरी!

फलटण/वैभव जगताप 


 सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर ,उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकूर व  वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. एल. डांगे व डीबी पथकाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत सलग ६दिवसात६ गुन्हे उघडकीस आणण्याचा मारला षटकार.

 कराड शहरात दिनांक १/९/२०२३ रोजी नवग्रह मंदिर परिसरातील विजय भांडी स्टोअर्सची पाठीमागली भिंत लोखंडी पारिच्या साह्याने फोडुन दुकानातील देवाच्या पितळी धातूच्या मूर्ती व पितळी कळस असा एकूण ६९०००/-रुपये चा मुद्देमाल चोरीस गेला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पो. उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी तातडीची मीटिंग घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. याच सूचनांचे पालन करीत कराड गुन्हे प्रकटीकरण पथकाने सलग ६दिवसात ६ गुन्हे उघडकीस आणण्याचा षटकार मारला.

१)गुन्हा रजिस्टर नंबर १०३६/२०२३कलम भारतीय दंड विधान ३७९ अन्वये नोंद असून एक आरोपीला अटक करत मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.२) गुन्हा रजिस्टर नंबर १०४९/२०२३ भारतीय दंड विधान कलम४५४,४५७,३८० अन्वये नोंद केली असून एक आरोपीस अटक करत शंभर टक्के रिकव्हरीसह घरफोडी उघड करण्यात आली आहे. ३) गुन्हा रजिस्टर नंबर १०५३/२०२३ भा.ह.कायदा कलम३(१),२५सह  भारतीय दंड विधान कलम३४ अन्वये नोंद असून दोन आरोपीस अटक करत पिस्टलसह एकूण१२.००.०००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.४) गुन्हा रजिस्टर नंबर १०४१/२०२३एन डी पी एस कलम २०ब अन्वये नोंद असून गुन्ह्यात दोन आरोपीस अटक करत  एक किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.५) गुन्हा रजिस्टर नंबर ७५३/२०२३कलम भारतीय दंड विधान ४२० अन्वये नोंद असून एक आरोपी अटक करत शंभर टक्के रिकव्हरी करण्यात आली आहे.६) गुन्हा रजिस्टर नंबर १०५७/२०२३कलम  भारतीय दंड विधान प्रमाणे ४५४,४५७,३८० अन्वये नोंद असून गुन्ह्यात दोन आरोपी अटक करत शंभर टक्के रिकव्हरी करण्यात आली आहे. सदर कारवाईत एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.


सदरची कामगिरी मा. पोलिस अधीक्षक समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, सातारा.मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर,मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डांगे,सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, सहाय्यक फौजदार संजय देवकुळे,पोलीस हवालदार शशी काळे, पोलीस नाईक संतोष पाडले, कुलदीप कोळी,पो.शि.महेश शिंदे, आनंदा जाधव,अमोल देशमुख, मुकेश मोरे,  दिग्विजय सांडगे,सोनाली पिसाळ यांनी केली.

*मुख्य संपादक :वैभव जगताप

https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL

Post a Comment

0 Comments