साखरवाडीतील रत्नबन प्रतिष्ठान कडून आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी दादा जाधव
साखरवाडीत ता.फलटण येथे शुक्रवार दि.२९.०९.२०२३ रोजी रत्नबन प्रतिष्ठान चे अध्यक्ष विरेंद्र जाधव व उपाध्यक्ष विनोद जाधव यांचे वडील बबनराव परशुराम जाधव यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त एच व्ही आय हॉस्पिटल मोहम्मंद वाडी पुणे व धन्वंतरी जनकल्याण सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने भव्य मोफत नेत्र तपासणी,हिमोग्लोबिन तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न झाले
शिबिराची सुरूवात ज्येष्ठ नागरिक डाॅ.खानविलकर व बबनराव परशुराम जाधव यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी बबनराव परशुराम जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला यावेळी त्यांना नागरिकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला परिसरातील नागरिक व महिला भगिनींनी नेत्र तपासणी,मोतीबिंदू तपासणी,हिमोग्लोबिन तपासणी करून घेतल्या
या कार्यक्रमावेळी रत्नबन प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष विनोद जाधव,युवा उद्योजक संजय भोसले,सुधीर भोसले,युवराज रणवरे,सुरज जाधव,रोहित जाधव,कुचेकर सर,काका गायकवाड,गायकवाड सर,तात्या भोसले,स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नबन प्रतिष्ठान चे सचिव हरिदास सावंत यांनी केले.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क :वैभव जगताप
८००७८५२१२१

Post a Comment
0 Comments