साखरवाडीत मुस्लिम समाज बांधवांकडून सामाजिक सलोखा जपत ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी
फलटण/वैभव जगताप
राज्यामध्ये अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद एकाच दिवशी आल्याने महाराष्ट्र राज्य सरकारने मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद साजरा करता यावा यासाठी
दि.२९.०९.२३ रोजी शासकीय सुट्टी जाहीर केली त्यानुसार साखरवाडी ता.फलटण येथे मुस्लिम समाजाकडून ईद ए मिलाद निमित्त आज दि.२९ रोजी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते
या शोभायात्रेमध्ये हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन दिसून आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी साखरवाडी गावचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले, सौदभाई शेख, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन शाहुराज भोसले, जेष्ठ समाजसेवक दिलीप (बाबा) पवार, युवा उद्योजक संजय भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे,मच्छिंद्र भोसले,आनंदा जाधव साखरवाडी व परिसरातील समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते संपूर्ण बाजार पेठेतून फेरी मारून अत्यंत नियोजनबद्ध ही शोभायात्रा पार पडली.
साखरवाडीचे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे,सहाय्यक फौजदार मोहन हांगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मुस्लिम समाज साखरवाडी बांधवांकडून विशेष आभार मानण्यात आले
यावेळी साखरवाडीतील मुस्लिम समाज साखरवाडी अध्यक्ष हाजी गुल मोहम्मद मदार भाई शेख, शौकत भाई कच्छी,सौद भाई शेख,सिराज भाई शेख,अरिफभाई मणेर, अन्वर महात, रिजवान मुजावर, फिरोज शेख, मुन्नाभाई खान, आसिफ शेख,तनवीर मनेर,शकील भाई शेख व समाज बांधव उपस्थित होते



Post a Comment
0 Comments