उंब्रज पोलिसांची दमदार कामगिरी
३६ वर्षे परागंदा आरोपीस शिताफीने पकडले.
सदर गुन्ह्यातील आरोपी लाला सिद्राम तेली हा गुन्हा घडल्यापासून सुमारे ३६ वर्ष परागंदा झालेला होता दि. २९/९/२३ रोजी कराड शहरात गणेशोत्सव बंदोबस्ता करीता हजर असलेले अपर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर यांना त्यांच्या बातमीदार मार्फत बातमी मिळाली की नमूद गुन्हयातील परागंदा आरोपी लाला सिद्राम तेली रा.मनव ता.कराड जि. सातारा हा त्याच्या राहत्या घरी आलेला आहे त्यानंतर अपर पोलीस अध्यक्ष श्री. बापू बांगर यांनी वाचक पोलीस उपनिरीक्षक श्री. विश्वास कडव यांच्या पथकास बातमीची खात्री करून सदर आरोपीचा शोध घेऊन मिळून आल्यास त्यास ताब्यात घेऊन संबंधित पोलीस ठाणे सादर करणे बाबत सूचना दिले होत्या त्याचप्रमाणे सदर पथकाने मनव, ता.कराड येथे जाऊन सापळा लावून नमूद आरोपीस मध्यरात्रीच्या सुमारास शिताफीने अटक करून पुढील कारवाईसाठी उंब्रज पोलीस ठाणे येथे हजर केले.
मिळालेल्या माहितीनुसार नोहेंबर १९८७साली मयत दत्तू ज्ञानू यलमारे याचा मौजे पाल (खंडोबा) ता. कराड जि. सातारा येथे कोयता व कु-हाडी सारख्या हत्यारे वापरून निघुर्न खुन केलेला होता त्यातील आरोपी १)लाला सिद्राम तेली, आरोपी २) संपत सिद्राम तेली, आरोपी ३) महादेव सिद्राम तेली व आरोपी ४) दत्तू अण्णा तेली सर्व रा.मनव ता.कराड जि.सातारा यांचा वरीलप्रमाणे गुन्हा उंब्रज पोलीस ठाणे येथे दाखल होता.
सदर कारवाई मध्ये पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा येथील वाचक पोलीस उपनिरीक्षक श्री. विश्वास कडव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन शेळके, मकरंद कवडे,पो.हवा. राकेश देवकर, पो.ना. गणेश जाधव, चालक पोलीस नाईक उदय यादव, पोलीस कॉन्स्टेबल आशिष पाटील, यांनी सहभाग घेऊन सदर कारवाईत घेऊन कारवाईत सहभागी अधिकारी व आमदार यांचे श्री.समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क :वैभव जगताप
८००७८५२१२१


Post a Comment
0 Comments