लोणंद पोलीस स्टेशनचे कार्य कौस्तुकास्पद!
तडवळे /वैभव जगताप
लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचरा मुक्त भारत लोणंद पोलीस ठाणे यांनी स्वच्छता मोहीम राबवली १आक्टोंबर, १ तास महाश्रमदान
आज दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वच्छता अभियान राबवणे बाबत मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य,मुंबई यांनी आदेशित केले असल्याने लोणंद पोलीस ठाणे परिसरामध्ये आज दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९:०० ते १०:०० या वेळेत पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार,होमगार्ड तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी यांचे सह संयुक्तरीत्या स्वच्छता अभियान घेण्यात आले आहे.
अभियानादरम्यान पोलीस ठाणे परिसर,पोलीस वसाहत परिसर स्वच्छता करण्यात आला असून लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील व ग्रामपंचायत प्रशासनास आपापले गावामध्ये स्वच्छता अभियान राबवणे बाबत आवाहन केले आहे सदरची स्वच्छता मोहीम लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील गावांमध्ये चालू आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क :वैभव जगताप
८००७८५२१२१





Post a Comment
0 Comments