महाश्रमदान स्वच्छ भारत मिशन अंतर्गत साखरवाडी ग्रामपंचायत वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळवाडी आणि साखरवाडी बस स्टॅन्ड मध्ये स्वच्छता मोहीम
प्रतिनिधी दादा जाधव
भारत देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी
१आक्टोंबर,१तास महाश्रमदान स्वच्छ भारत मिशन देशामध्ये स्वच्छ भारत कार्यक्रम राबविण्यात यावा असे आवाहन करण्यात आले होते
त्यानुसार साखरवाडी ता.फलटण ग्रामपंचायत साखरवाडी अंतर्गत १आक्टोंबर, १ तास महाश्रमदान स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळवाडी आणि साखरवाडी बस स्टॅन्ड आणि इतर परिसर स्वच्छ करण्यात आला
साखरवाडी ग्रामपंचायत चे माजी सरपंच व विद्यमान सदस्य विक्रमसिंह भोसले, ग्रामसेवक येळे अण्णा,सामाजिक कार्यकर्ते दिलीप बाबा पवार,विकी भोसले,संग्राम औचरे,निखील चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क: वैभव जगताप
८००७८५२१२१

Post a Comment
0 Comments