जागतिक जेष्ठ नागरीक दिनानिमित्त सातारा जिल्हा पोलीस दलाचे वतीने जेष्ट नागरीकांना जेष्ठ नागरीक कायदा व हेल्पलाईन बाबत मार्गदर्शन
सातारा/वैभव जगताप
दिनांक ०१/१०/२०२३ रोजी जागतिक जेष्ठ नागरीक दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा पोलीस दलाचे वतीने आर. सी. पी. हॉल पोलीस मुख्यालय सातारा येथे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. कोंडीराम पाटील पोलीस उपअधीक्षक (गृह) यांच्या उपस्थितीत जागतिक जेष्ठ नागरीक दिनाचे आयोजन करण्यात आले होते.नमुद कार्यक्रमास सातारा जिल्हयातील महिला व पुरुष जेष्ठ नागरीक उपस्थित होते. पोलीस उपअधीक्षक(गृह) कोंडीराम पाटील व पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी पोलीस दलाचे वतीने जेष्ठ नागरीकांच्या तक्रारी व अडीअडचणी जाणून घेतल्या.
भरोसा सेल सातारा येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जेष्ठ नागरीकांना जेष्ठ नागरीक कायदा २००७ मधील तरतुदीबाबत सविस्तर माहिती दिली, तसेच जेष्ठ हक्कांबाबत त्यांना मार्गदर्शन केले.जेष्ठ नागरीकांच्या अडचणीच्या अनुशंगाने त्यांना तात्काळ पोलीस मदत मिळणेकामी डायल ११२ वर संपर्क करणेबाबत सुचना दिल्या. तसेच जिल्हा पोलीस दलाचा हेल्पलाईन क्र. १०९० हा सतत २४ तास जेष्ठ नागरीकांकरीता उपलब्ध असल्याबाबत माहिती दिली. त्यावेळी उपस्थित जेष्ठ नागरीकांनी आपले मनोगत व्यक्त करुन जिल्हा पोलीस दलाचा हा अभिनव उपक्रम असलेचे सांगून, जेष्ठ नागरीकांना मोठाआधार असल्याचे विचार व्यक्त केले आहेत.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री. कोंडीराम पाटील पोलीस उपअधीक्षक (गृह), पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपपनिरीक्षक मदन फाळके, जेष्ठ नागरीक कक्षाचे पोलीस अंमलदार नंदकुमार चव्हाण,विनायक राऊत, अंजली लोखंडे, तृप्ती मोहीते, परशुराम वाघमारे यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले.

Post a Comment
0 Comments