Type Here to Get Search Results !

सातारा स्थानिक गुन्हे शाखा यांची पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई!

 सातारा स्थानिक गुन्हे शाखा यांची पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई!


फलटण/वैभव जगताप


महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला ४७,०१,९२० /- रुपये गुटखा विमल पान मसाला, रजनीगंधा पानमसाला ( गुटखा)व २०,००,०००/- रुपये टाटा ११०९ ट्रक कंटेनर असा एकूण ६७,०१,९२०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला गुटखा विक्रेत्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना गुटखा विक्रेत्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

दि.०१/१०/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, एक इसम टाटा ११०९ ट्रक कंटेनर मधून महाराष्ट्र राज्यामध्ये विक्री / वाहतूक करीता प्रतिबंधीत असलेला गुटखा पुणे येथे घेवून जाणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास नमुद वाहन ताब्यात घेवून पुढीलकार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे नमुद पथकाने शेंद्रे ता. जि. सातारा गावचे हद्दीत राजस्थानी हायवे हॉटेलच्या जवळ  सापळा लावला असता . १२.२० वा. च्या  सुमारास प्राप्त माहिती मधील टाटा ११०९ ट्रक कंटेनर आल्याने त्यास थांबवून त्यामधील चालकाकडे विचारपूस केली असता त्याने कंटेनरमध्ये विमल खुटखा रजनीगंधा गुटखाअसल्याचे सांगीतल्याने विमल पान मसाला व व्ही. - १ टोबॅको (तंबाखू), रजनीगंधा फ्लेवर्ड पानमसाला, तुलसी रॉयल जाफराणी जर्दा असा ४७,०१,९२० /- रुपये किमतीचा प्रतिबंधीत गुटखा व २०,००,०००/- रुपये किमतीचा ट्रक कंटेनर असा एकूण ६७,०१,९२० /- रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सदर बाबत अन्न सुरक्षाअधिकारी श्रीमती वंदना रुपनवर, श्री. इम्रान हवालदार यांना कळविल्यानंतर त्यांनी समक्ष हजर होवून ताब्यात घेतलेला मुद्देमाल जप्त केला असून त्याबाबत सातारा तालूका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पंतग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, पोलीस अंमलदार अतिश घाडगे,संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने, सचिन साळूंखे, प्रविण फडतरे, सनी आवटे, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, स्वप्नील कुंभार, अमित माने, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, मोहन पवार, पृथ्वीराज जाधव, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईत सहभागी अधिकारी वअंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनीअभिनंदन केले आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क: वैभव जगताप 

मोबाईल नंबर :-८००७८५२१२१

Post a Comment

0 Comments