जबरीने मारहाण करुन रोख रक्कम, सोने, गाडी, मोबाईल लुटणारी अट्टल टोळी शिताफीने जेरबद
फलटण/वैभव जगताप
उंब्रज पोलीस टिमची प्रशंसनीय कामगिरी
दिनांक ०९/०९/२०२३ रोजी रात्री ०१.३० वा. मौजे शामगांव ता. कराड गावचे हद्दीत शामगांव घाटात एक महिंद्रा बोलोरे पिकअप, सोन्याची चौन, रोख रक्कम, आय फोन कंपनीचा मोबाईल असा एकूण ७,१७,५००/- किंमतीचा मुद्देमाल ४ अनोळखी इसमांनी फिर्यादी नामे अमिन दाऊल वडगांवकर रा. समतानगर, मिरज जि. सांगली यांना गाडी आडवी मारुन त्यांना जबरदस्तीने खाली ओढून पोलो गाडीत बसवून एका शेतात नवून त्या ठिकाणी हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करुन जबरदस्तीने चोरुन नेहली म्हणून उंब्रज पोलीस स्टेशन गु. र. नं. ५४८/२०२३ भादंवि कलम ३९२, ३९४,५०४, ५०६,३४ प्रमाणे दाखल करणेत आलेवर सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांनी पोलीस टीम तयार करुन पसार झालेले अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी योग्य सुचना देवून मार्गदर्शन केलेने पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, पो. हवा. संजय धुमाळ, पो. कॉ. मयुर थोरात, पो. कॉ. राजकुमार कोळी, पो. कॉ. गणेश कुंदे यांनी सदर गुन्हा करून पसार झालेले आरोपी नामे बबलु रमेश सुर्यवंशी, यश अजित कांबळे, महेश रामचंद्र आवळे तिघे रा. हातकणंगले जि. कोल्हापूर यांना इंचलकरंली जि. सांगली येथून व अरोपी नामे अनुश चिंताणी पाटील, वैभव रविंद्र पावस्कर दोघे रा. सातारा यांना सातारा येथून शिताफिने दिनांक २४/०९/२०२३ रोजी ताब्यात घेतले आहे. सदर पाच आरोपी यांचेकडे विचारपुस करुन त्यांचेकडून ६,००,०००/- रुपये किंमीची एक चार चाकी गाडी, ३०,०००/- रुपये किंमतीचा मोबाईल तसेच आरोपीनीगुन्हा करतेवेळी वापरलेली एक पोलो गाडी अशा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.
तसेच यात अज्ञात आणखी काही संशयीत आरोपींचा शोध घेण्याचे काम चालू आहे. सदर गुन्ह्याचे तपासामध्ये योग्य ते कलम वाढ करणेत आलेली आहे.
अशा प्रकारे उंब्रज गुन्हे प्रकटीकरण शाखेने जबरीने मारहाण करुन रोख रक्कम, सोने, गाडी, मोबाईल लुटणारी अट्टल टोळी गोपनीय व तांत्रिक माहितीचे अधारे जेरबंद करणेत आले आहे.

Post a Comment
0 Comments