जिंती गावात जाणता राजा नवरात्र तरुण उत्सव मंडळास ३० वर्ष पूर्ण मंडळाचे कार्य कौतुकास्पद
प्रतिनिधी/ दादा जाधव
प्रसाद बाबा यांच्या लेखणीतून
जिंती गावात जाणता राजा नवरात्र तरुण उत्सव मंडळ जिंती हे नवरात्र उत्सव मंडळ 17 तरुण मुलं एकत्र येऊन या मंडळाची स्थापना करण्यात आली ही स्थापना 1994 साली करण्यात आली या तरुण मुलांना हे मंडळ स्थापन करण्यासाठी खूप अडचणीं , संघर्षाचा सामना करावा लागला पहिली गोष्ट म्हणजे ज्यावर्षी देवी बसवायची होती त्यावर्षी देवीला पत्र्याचे शेड नव्हते तो काळ असा होता पाऊस आल्यावर या सर्व तरुण मुलांनी आळीपाळीने आई तुळजाभवानीच्या मूर्तीवर छत्री धरून उभे राहिले या मंडळाची सुरुवात अशा प्रकारे सुरू झाली आणखी भरपूर कारणे आहेत ते कारणे या मुलांनाच माहिती अक्षरशः या 17 तरुण मुले एकत्र येऊन जिंती गावातील व परगावात घाटावर जाऊन शेतकऱ्यांची बाजरी, ज्वारी, लागण करणे, सरी तोडणे, कोणाचे घर पाडायचे असेल तर ते एकत्र येऊन पाडत होती. इत्यादी कामे करून पैसे जमा केले आणि या मंडळाला आर्थिक स्वरूप प्राप्त होत गेले या सर्व तरुण मुलांनी या मंडळाचे काही धोरणे आखली होती ती धोरण म्हणजे कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांकडून पैसे घ्यायचे नाहीत ,दुसरे धोरण म्हणजे गरीब ,श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक. तिसरे धोरण म्हणजे कोणत्याही देवीच्या भक्तांना या तरुण मुलांनी वर्गणी मागितली नाही. फक्त पावती पुस्तक छापून आणत होते भक्तांनी स्वखुशीने हे पावती पुस्तक हळूहळू भरत गेले. असे त्यांची धोरणे असल्याकारणाने या मंडळाला आता गोकुळासारखे दिवस प्राप्त झाले हे सर्व करत असताना या तरुण मुलांच्या मनात हृदयात एकच भावना होती आपले नवरात्र उत्सव मंडळ एक काळ खूप मोठे व्हावे या दृष्टिकोनातून त्यांनी एवढ्या संघर्षाचा काळ पाहिला उभा राहिला हे समीकरण सोपे नव्हे अक्षरशा पंचक्रोशी मध्ये या मंडळाचे नावलौकिक आहे आणि या या मंडळाचे हे संस्कार आपल्याला कोठेच पाहिला मिळणार नाहीत या तरुण मुलांकडे ईरसल ,जिद्द ,चिकाटी, प्रेरणा, शुद्ध भाव, या सर्व गोष्टींना त्यांनी वाहून घेतल्यावर हे सर्व घडून आले आणि आई तुळजा भवानी देवीने या मुलांना आशीर्वाद रुपी उभा करण्यास ताकद दिली आणि आज या मंडळाला 30 वर्षे पूर्ण होत आहेत याचा आनंद जिंती गावातील आई तुळजा भवानी भक्तांना अतोनात आहे असाच आदर युक्त भावना कायम राहील हे संस्कार आम्ही तरुण मुलांनी स्वीकारले आहेत
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क :वैभव जगताप
मोबाईल -८००७८५२१२१

Post a Comment
0 Comments