श्री दत्त इंडिया साखर कारखान्याने गतवर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता दसऱ्यापूर्वी द्यावा व नवीन दर जाहीर केल्याशिवाय धुराडी पेटू देणार नाही
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा
शेतकरी ऊस उत्पादक उसाच्या तोडी घेणार नाहीत तसेच बाहेरून आणणारा ऊसही रोखणार
प्रतिनिधी साखरवाडी
सोमवार दि.१६.१०.२३ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून श्री दत्त इंडिया शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखाना साखरवाडी वर मागील ऊस गळीत हंगामातील सन २०२२/२३ साली गाळप झालेल्या उसाच्या दुसरा हप्ता मिळणेसाठी उस उत्पादक शेतकरयांचा भव्य मोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
साखरवाडी ग्रामपंचायत येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर हस्ते पुष्पहार अर्पण करून मोर्च्याची सुरवात करण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष नितीन यादव,दादा जाधव
रवींद्र घाडगे, प्रमोद गाडे,सचिन खानविलकर,शकिल शेख,किरण भोसले,निलेश भोसले,राजेंद्र धनसिंग भोसले,दादा गायकवाड उपस्थित होते
गेल्या वर्षी गाळप झालेल्या ऊसाचे अंतिम बिल आपल्या कारखान्याने ३४११ प्रती टन ऊस दर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दसऱ्यापर्यंत जमा करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली तसेच फलटण तालुक्यातील शेतकरी वर्षोनुवर्षे इतर शेजारील कारखान्याच्या तुलनेत कमी ऊस दर घेत आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे व पाऊस काळ न झाल्यामुळे अडचणीत आला आहे त्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी दत्त इंडिया शुगर कारखान्याने माळेगाव कारखान्याचा इतका दर जाहीर करावा
अन्यथा दसऱ्या नंतर मा.खा.राजु शेट्टी साहेब जो आंदोलनाचा आदेश देतील त्या प्रमाणे आपल्या कारखान्यावर आंदोलन करण्यात येईल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी असा इशारा दिला
तसेच शेतकरी बांधवांनी गतवर्षी तुटलेला उसाचा दुसरा हप्ता व दर जाहीर न केल्यास आम्ही ऊसतोड घेणार नाही आणि श्री दत्त इंडिया कारखान्यास ऊस घालणार नाही व बाहेरून येणारा ऊसही थांबवू अशी ठाम भूमिका यावेळी घेण्यात आली
या विषयाचे निवेदन श्री दत्त इंडिया कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर अजित जगताप यांनी स्वीकारले व शेतकऱ्यांना योग्य तो दर दिला जाईल असे आश्वासन दिले
या मोर्चात साखरवाडी परिसरातील सर्व शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते





Post a Comment
0 Comments