Type Here to Get Search Results !

सोमंथळी येथे दूध संघर्ष महाभियान कार्यक्रम संपन्न

 सोमंथळी येथे दूध संघर्ष महाभियान कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी /तानाजी सोडमिसे 



सोमंथळी येथील स्वयंभू श्री दक्षिण मुखी हनुमान मूर्तीला दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादक राज्य व्यापी एल्गार करणार अशी घोषणा दूध संघर्ष महाअभियान व सोमंथळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणा केली राज्यात दूध उत्पादकांच्या दृष्टीने सोमंथळी हे गाव  पहिल्या क्रमांकावर आहे.

राज्याचा दूध विकास विभाग गेली अनेक वर्ष निष्क्रिय भूमिकेत आहे. दुग्ध विकास मंत्री दूध उत्पादकांच्या मागण्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहेत. आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता. दुग्धविकास मंत्री दूध विकास विभागाने शेतकऱ्यांच्या बाजूने तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे.

दुधाचा दर कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे गत तीन महिन्यापूर्वी मिळणारा प्रति लिटर ४० रुपये हा दर आता ३१ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत 

फलटण तालुक्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी कर्ज काढून दुग्ध व्यवसाय सुरू केलेला आहे. सर्व काही सुरळीतपणे सुरू होते गत तीन महिन्यापासून अचानक दुधाचे दर कमी पशुखाद्य चारा व औषध उपचार याचा खर्चही पदरमोड करून करावा लागत आहे. आज फलटण तालुक्यात गाय व म्हैस अशी जवळपास ९५ हजार इतकी जनावरांची संख्या असून हजारो तरुण दूध व्यवसाय करीत आहेत.

सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी असल्याने चारा उपलब्ध नाही बागायत परिसरातून साडेतीन ते चार हजार रुपये प्रति अडीच गुंठ्यासाठी द्यावी लागत असून वाहतुकीसाठी वेगळा खर्च होतो आहे त्यात दुधाचा दर वाढण्याऐवजी कमी झाल्याने पदरमोड करून जनावरे जगवावी लागत आहेत

नोकरी अभावी बँकेचे कर्ज काढून व्यवसाय केला  मात्र सध्या दर कमी झाल्याने रोजचा तोटा सहन करावा लागत आहे तातडीने दरवाढ न केल्यास शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढेल याला जबाबदार कोण

दूध उत्पादक शेतकऱ्यांची दुधाला उत्पादन खर्चावर१५ टक्के नफा गृहीत धरून दर जाहीर करावा उसाच्या धर्तीवर दुधाला एफ आर पी चे कायदेशीर कवच देण्यात यावे दूध दर मूल्य आयोगाची स्थापना करून त्यास वैधानिक दर्जा देण्यात यावा पशुखाद्य दरावर शासनाचे नियंत्रण असावे आणि भेसळ दूध विक्रेत्यांना पकडून कडक कारवाई करून शिक्षा देण्यात यावी आधी मागणीसाठी दूध संघर्ष अभियान राबविण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना अभ्यासक सतीश देशमुख यांनी माहिती अधिकार अंतर्गत मिळालेली दूध उत्पादन खर्च व इतर माहिती सांगताना आम्ही येणाऱ्या काळात कायदेशीर लढा देणार असल्याचे सांगितले तसेच दत्तात्रेय कड यांनी शेतकऱ्यांच्या आजच्या दयनीय आर्थिक परिस्थितीला सरकारची शेतकरी हिताच्या विरोधात  धोरण व प्रस्थापित  पक्ष आणि नेते जबाबदार  असल्याचे सांगितले यावेळी पुरंदरचे  निरा डावा कालवा अस्तरीकरण विरोधी समन्वयक समाजसेवक शेतकरी बंधू महेश  जेधे व खंडू करचे यांनी भेसळ वर कडक कारवाईची तसेच दूध डेअरी महासंघाचे काम पारदर्शक करण्यास मागणी केली तरडोलीचे  दूध  उपोषण कर्ते  सागर जाधव यांनी मार्गदर्शन केले. महा अभियानास सोमंथळी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून समस्या मांडल्या

यावेळी ॲड. नरसिंग निकम, मा. सभापती दत्तात्रय गुंजवटे, मा. उपसभापती संजय सोडमिसे,सरपंच किरण सोडमिसे, चेअरमन महादेव अलगुडे, चेअरमन विठ्ठल सोडमिसे , चेअरमन आबासो शिपकुले, किसन करचे,  रामहरी भापकर, हनुमंत पोकळे, रामभाऊ करचे,  हणमंत सोडमिसे आयोजक विक्रम शिपकुले, दत्ता गोफणे, बबन जाधव, हनुमंत शिपकुले, चंद्रकांत सोडमिसे, विकास यादव , दशरथ करचे सोमंथळी पंचक्रोशीतील मान्यवर व  ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -८००७८५२१२१

Post a Comment

0 Comments