साखरवाडीमध्ये सर्वात मोठा सन्मान सोहळा !
फलटण/वैभव जगताप
श्री. भवानीमाता नवरात्र शारदोत्सव मंडळ, साखरवाडी
बाजारपेठ, ता. फलटण, जि. सातारा.आयोजीत
सर्वांना कळविण्यास आनंद वाटतो की, यावर्षीचा
श्री राजलक्ष्मी शारदोत्सव साखरवाडी समाजभूषण पुरस्कार
माननीय श्री. राजेश गडकरी व कुमारी प्रतिभा गुरव
(जलहरी श्बनाक वृध्दाश्रम, खानापूर, जि. सांगली)
या मान्यवरांना
सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक(sp)
माननीय श्री. समीर जी शेख
यांचे शुभहस्ते
प्रदान करण्यात येणार आहे. कृपया बहुसंख्येने उपस्थित राहून उपकृत करावे, ही नम्र विनंती.
वेळ : सोमवार दिनांक २३/१०/२०२३ रोजी रात्री ८.३० वा. • स्थळ : बाजारपेठ, श्री भवानीमाता मंदिरासमोर, साखरवाडी.
→ आपले स्नेहांकित
श्री. हरिदास दिगंबर सावंत कार्यवाह
श्री. दत्तात्रय शिवराम भोसले अध्यक्ष
सर्व सभासद बंधू, श्री भवानीमाता नवरात्र शारदोत्सव मंडळ, साखरवाडी.
जलहरी श्बनाक वृद्धाश्रमची स्थापना २०१७ मध्ये मुंबईस्थित असलेल्या आदरणीय श्री राजेश वसंतराव गडकरी यांनी केली. प्रकल्प उभा असलेली जमीन दानशूर कु. प्रतिभा गुरव यांनी वयोवृद्धांच्या सेवेकरिता दान केलेली आहे.
प्रकल्प स्थापनेचा उद्देश हा
१) बेवारस निराधार, अंथरुणाला खिळलेल्या आजी आजोबांना निःशुल्क सेवा देणे हा आहे.
२) केवळ दोनवेळचे जेवण देणे हा उद्देश नसून वयोवृद्धांचे आत्मशुद्धीकरण व्हावे स्नेहभाव उत्पन्न व्हावा याकरिता अहोरात्र प्रयत्न मागील सहा वर्षांपासून सुरू आहेत.प्रकल्पाच्या बांधकामपासून सर्व आर्थिकबाबी संस्थापक श्री राजेश गडकरी वैयक्तिक करत असून, श्री राजेश गडकरी यांनी लग्न केले नसून आपल्या परिसरात बेवारस निराधार वयोवृद्धांकरीता सामाजिक प्रकल्प उभा करण्याच्या ध्येयातून त्यांनी आपले मुंबईतील स्वतःचे घर विकले आहे. व्यवसायातील आर्थिक मिळकतीतून हा प्रकल्प या ध्येयवेड्या व्यक्तीने उभा केलेला आहे.प्रकल्पात २४ तास राहून रात्रंदिवस संस्थापक आदरणीय श्री. राजेश गडकरी व उपाध्यक्ष कु. प्रतिभा गुरव वयोवृद्धांच्या सेवेत कार्यरत आहेत. सद्या प्रकल्पात ३८ आजी आजोबा सेवा घेत आहेत. प्रकल्पात दाखल होणारे आजी आजोबा हे रुग्णालयांमार्फत,पोलीस स्टेशन मार्फत, तसेच रस्त्यावर, रेल्वे स्टेशन, बस स्टँडवर मागून खाणारे वयोवृद्ध, मनोरुग्ण असून काही वयोवृद्ध हे नातेवाईकांमार्फत काही कारणास्तव दाखल केलेले आहेत. प्रकल्पाच्या माध्यमातून २०० च्या वर वयोवृद्धांनी सेवा घेतलेली आहे.प्रकल्पातील अंथरुणाला खिळलेल्या आजी आजोबांची सुश्रुषा उपाध्यक्ष आदरणीय कु. प्रतिभा गुरव मनोभावे करत आहेत त्यांनी समाजकार्य विभागात मुबंईत पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. पुढे Phd करिता परीक्षा पास झाल्या आहेत.
प्रकल्पातील दिनचर्या :
सकाळी चहा नंतर आठ वाजता व्यायाम, ध्यानधारणा, बोधकथा सांगितली जाते. You Tube च्या माध्यमातून भक्तिसंगीत, प्रवचन ऐकले जाते. पेपर, पुस्तके वाचणे, दुपारच्या विश्रांतीनंतर चहा नंतर चालणे-फिरणे, एकत्र बसून सायंकाळी प्रार्थना घेतली जाते,संध्याकाळी साडे सहा वाजता प्रोजेक्टरच्या माध्यमातून पडद्यावर चित्रपट, पर्यटन स्थळे दाखवले जातात.
प्रकल्पात एकही वृद्ध नसावा अशी आमची भावना आहे, पण लग्न न केलेले वयोवृद्ध, अपत्य न झालेले जोडपे/वयोवृद्ध, मुलींकडे न राहणारे वयोवृद्ध, अपंग, मनोरुग्ण, वयोवृद्ध, घर सोडून वर्षानुवर्षे मागून खाणारे वयोवृद्धांना निःशुल्क आधार मिळावा या दृष्टीने कार्यरत आहोत, भूतकाळ विसरून आयुष्याच्या या वळणावर वयोवृध्दना मानसिक, भावनिक आधाराची नितांत गरज भासते,एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन प्रकल्पात गोडी गुलाबीने आजी आजोबांनी एकत्र कुटुंब म्हणून राहावं या प्रयत्नांत आदरणीय संस्थापक व उपाध्यक्ष झडत आहेत.
प्रकल्पाला कायमस्वरूपी जबाबदारी उचलणारे दानशूर व्यक्ती मिळावेत अशी अपेक्षा आहे यामध्ये दरमहा दुधाचा, दरमहा गॅससिलेंडर, किराणा अन्नधान्य, लाईट बिल, भाजीपाला खर्च उचलणारे, डायपर व इतर मेडिकल साहित्याची अत्यंत आवश्यकता आहे, जमलेस तर आजी आजोबांचे पालकत्व कायमस्वरूपी स्वीकारणारे, श्रमदान करणारे स्वयंसेवकांची नितांत गरज आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -८००७८५२१२१

Post a Comment
0 Comments