Type Here to Get Search Results !

लोणंद पोलिसांची दमदार कामगिरी

 लोणंद पोलिसांची दमदार कामगिरी !

फलटण/वैभव जगताप 



गुन्हा दाखल होण्यापुर्वीची चोरीचा मालट्रक व आरोपी जेरबंद करणेत लोणंद पोलीसांना यश, 2,10,000/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत लोणंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर 497/2023 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951चे कलम 124 प्रमाणे दाखल आहे.दिनांक 25/10/2023 रोजी पहाटे 4.00 वाजताचे सुमारास श्री सुशिल भोसले सहा.पोलीस निरीक्षक, लोणंद पोलीस स्टेशन यांना त्यांचे बातमीदार यांचे मार्फत माहीती प्राप्त झाली की,सातारा बाजुकडुन एक लाल रंगाचा चोरी केलेला ट्रक हा लोणंद बाजुकडे येत आहे अशी माहीती प्राप्त झाल्याने आम्ही तात्काळ लोणंद शहरात नाकाबंदी नेमली. सकाळी 7.00 वाजताचे सुमारास पोकॉ. गोविंद आंधळे व होम. गणेश इंगवले यांना बँक ऑफ महाराष्ट्र येथे लाल रंगाचा ट्रक सातारा बाजुकडुन माल ट्रक टाटा 1613 क्रमांक एम.एच.11.एम. 4706 हा आलेला दिसल्याने त्यांनी तो थांबवला. त्यावरील चालक नामे संतोष देटके रा. तारळे ता. पाटण हा पोलीस पाहुन तेथुन पळुन गेला. ट्रकमधील दुसऱ्या इसम प्रशांत अरुण ढवळे वय 26 रा. तारळे ता. पाटण जि. सातारा यांना पकडण्यात पोलीसांना यश मिळाले. त्याचे ताब्यात ओपो व रिअलमी कंपनीचे मोबाईल मिळुनआले. आरोपी कडुन 2,10,000/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशी अंती त्याने नमुद मालट्रक हा काशीळ येथुन चोरी करुन आणल्याचे सांगीतले. बोरगाव पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांचेशी संपर्क करुन बोरगाव येथे मालट्रक चोरीचा गुन्हा दाखल होण्यापुर्वी चोरीचा मालट्रक व आरोपी लोणंद पोलीसांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी बोरगाव पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले आहे.सदरची कारवाई ही मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री सुशिल भोसले सहा. पोलीस निरीक्षक, श्री विशाल कदम पोउनि, सपोफौ. देवेंद्र पाडवी, सपोफौ. महेश सपकाळ, पोहवा नितीन भोसले, पोहवा किशोरकुमार मिसाळ, पोहवा अतुल कुंभार, पोहवा धनाजी भिसे, पोकॉ. गोविंदआंधळे, चापोकॉ. संजय चव्हाण, होम. गणेश इंगवले, यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -८००७८५२१२१

Post a Comment

0 Comments