Type Here to Get Search Results !

औंध पोलीस स्टेशन यांची कामगीरी...!

 औंध पोलीस स्टेशन यांची कामगीरी...!

फलटण/वैभव जगताप 


धोंडीराम वाळवेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी स्टाफसह मौजे वरुड ता खटाव येथे

छापा मारुन एकुण २,०४,५००/- रुपये किमतीचा गांजा केला जप्त

मा. समीर शेख पोलीस अधीक्षक सो सातारा, मा. आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक

सातारा, यांचे सुचनेप्रमाणे व मा. अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग

कॅम्प वडुज यांचे मार्गदर्शनाखाली धोंडीराम वाळवेकर सहा. पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी

औंध पोलीस स्टेशन यांना मौजे वरुड ता खटाव येथिल साळुंखेवस्ती मधील इसम नामे ईश्वर

दत्तात्रय जगदाळे हा त्याचे गुरांचे गोठयालगत ओढयाचे कडेला गांजाचे झाडे लावुन आणि

त्याची विक्री करीत असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळालेने त्यांनी आपले सोबत पोउपनि केंद्रे

सपोफौ.पाटोळे, पो.हवा/१७२९ देवकुळे, पो हवा/२४३ बनसोडे, पोकॉ/२३९२ भुजबळ, पो

कॉ/२५०३ झारी, पो कॉ/२०१७ जाधव, पोकॉ/१४९८ कदम, मपोकॉ/११० फडतरे, मपोकॉ/२४०८

भुजबळ यांचे पथक तयार करुन सरकारी पंच, फोटोग्राफर, वजनकाटा धारक यांना सोबत

घेवुन मौजे वरुड ता खटाव जि सातारा येथील साळुंखे वस्ती मधील इसम नामे ईश्वर दत्तात्रय

जगदाळे यांचे गुरांचे गोठयाजवळ छापा मारुन सुमारे २,०४,५००/- रुपये किमतीचा गांजा त्यात

लागवड केलेली गांजाची झाडे असा मुद्देमाल जप्त केलेला असुन औंध पोलीस स्टेशनला गुरनं

२८९/२०२३ गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम

१९८५ कलम ८,२०(अ)(ब).(२),२२(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई वेळी पोलीसांनी वेषांतर करुन गुरांची माहिती विचारत सदर आरोपींचे गुरांचे गोठयाजवळील बारकाईने पाहणी करुन सदरच्या गांजाची झाडे शोधुन यशस्वी कारवाई केलेली आहे.औंध पोलीस स्टेशनची आतापर्यतची सर्वात मोठया रकमेची गांजाची कारवाई केलेने औंध परिसरातील नागरीकांनी पोलीसांचे अभिनंदन केले आहे.

सदर कारवाईमुळे औंध परिसरातील अवैद्य धंदे करणाऱ्या लोकांवर चाप बसणार असुन गांजामुळे तरुण पिढी व्यसनाधिनतेपासुन परावृत्त होणार आहे.सदरची कारवाई ही मा. समीर शेख पोलीस अधीक्षक सो सातारा, मा.आंचल दलालअपर पोलीस अधीक्षक सातारा, यांचे सुचनेप्रमाणे व मा. अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग कॅम्प वडुज यांचे मार्गदर्शनाखाली धोंडीराम वाळवेकर सहा. पोलीस निरीक्षक व गंगाप्रसाद केंद्रे पोलीस उपनिरीक्षक, सहा. फौज.पी.एस.पाटोळे, पो.हवा. डी वाय देवकुळे, पो हवा. आर एस बनसोडे, पो कॉ.पी.डी. भुजबळ, पो कॉ. एम आर जाधव, पो कॉ.एस एम झारी, पो कॉ एम व्ही कदम, मपोकॉ एम. के. फडतरे, मपोकॉ एन. पी. भुजबळ यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments