सातारा जिल्हा पोलीस दल आयोजित उपक्रम, “संवाद- तक्रारदारांशी"
फलटण/ वैभव जगताप
गुरुवार दि.०६ जुलै २०२३ रोजी पासून सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक,सातारा, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या सहभागातून “संवाद- तक्रारदारांशी " हा उपक्रम सातारा जिल्हयातील पोलीस उपविभागीय कार्यालय स्तरावर राबविण्यात येत आहे.पोलीस दल व जनता यांच्यामध्ये सौहार्दपुर्ण संबंध निर्माण व्हावेत, तक्रारदारांच्या तक्रारींची योग्य व कायदेशीर दखल घेता यावी, तक्रारदारांना त्यांच्या तक्रारीचे निरसरन न झाल्याने विनाकारण पोलीस अधीक्षक कार्यालयास तक्रार घेवून जावे लागू नये, तसेच पोलीस विभागाशी संबंधीत सर्व समस्या तात्काळ सोडविता याव्यात या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.सातारा जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे ठिकाणी (सातारा,कोरेगांव, वाई, कराड, फलटण, पाटण, वडूज) दर १५ दिवसांनी म्हणजेच महिन्यातील पहिल्या व तिसऱ्या गुरूवारी १०.०० ते १३.०० या वेळेत “संवाद- तक्रारदारांशी" हा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सदर उपक्रमात जिल्हयातील सर्व नागरीक, सैनिक व त्यांचे नातेवाईक यांच्या तक्रारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सोडविण्यात येणार आहेत.तसेच पोलीस अधीक्षक, सातारा व अपर पोलीस अधीक्षक, सातारा हे कोणत्याही एका विभागामध्ये “संवाद- तक्रारदारांशी" या उपक्रमास उपस्थित राहणार आहेत.तरी नागरीकांती आपल्या पोलीस विभागाशी संबंधीत काही तक्रारी असल्यास "संवाद तक्रारदारांशी” या उपक्रमात दिनांक ०२/११/२०२३ रोजी आपले हद्दीतील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय (सातारा, कोरेगांव, वाई, कराड, फलटण, पाटण, वडूज) येथे १०.०० ते१३.०० या वेळेत सहभागी व्हावे असे आव्हान सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -८००७८५२१२१
-

Post a Comment
0 Comments