Type Here to Get Search Results !

सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार अजय जाधव व त्याच्या ६ साथीदारांना केले तडीपार!

 सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार अजय जाधव व त्याच्या ६ साथीदारांना केले तडीपार!

फलटण/वैभव जगताप 









 सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगार अजय ऊर्फ लल्लन जाधव यास व त्याचे ०६ जणांच्या टोळीस सातारा पोलीसांनी केले तडीपार! 

सातारा जिल्हयामध्ये सातारा शहर, सातारा तालुक्यातील सातत्याने मालमत्तेचे तसेच शरिराविरुध्दचे गुन्हे कारणारा टोळी प्रमुख १) अजय उर्फ लल्लन दत्तात्रय जाधव वय २८ वर्षे, रा. प्रतापसिंहनगर खेड सातारा तसेच टोळी सदस्य २) विलास उर्फ यल्या शरणप्पा कुरमणी वय २२ वर्षे, रा. आंबेडकर भवन वनवासवाडी ता. जि. सातारा, ३) सर्जेराव उर्फ छोट्या पांडुरंग कांबळे वय २० वर्षे, रा. प्रतापसिंहनगर खेड सातारा ४) टोळी सदस्य अजय नंदकुमार खवळे वय २२ वर्षे, रा. प्रतापसिंहनगर खेड ता. जि.सातारा. ५) रोहित दादासाहेब वाघमारे वय १९ वर्षे, रा. प्रतापसिंहनगर खेड ता. जि. सातारा. ६) ऋषीकेश उर्फ डोंगुल्या नाना कांबळे वय २३ वर्षे, रा. प्रतापसिंहनगर खेड ता. जि. सातारा ७) धनंजय ज्ञानदेव बडेकर, वय ३४ वर्षे, रा. प्रतापसिंहनगर खेड ता जि सातारा यांचेवर सातारा जिल्हयामध्ये खंडणी मागणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, सरकारी नोकरास मारहाण करुन विनयभंग दुखापत करणे, दरोडा, घरफोडी, बेकायदेशीर जमाव जमवुन शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, मा. जिल्हादंडाधिकारी सो सातारा यांचे कडील मनाई आदेशाचे उल्लंघण करणे, शिवीगाळ दमदाटी करणेबाबतचे टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचेवर एकुण११ गुन्हे दाखल असल्याने सातारा शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक एम. जे. जगताप यांनी सदर टोळी विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा जिल्हयातुन तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी किरणकुमार सुर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग यांनी केली होती.

यातील टोळीमधील इसमांना दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांना अटक व कायदेशिर कारवाई करुनही ते जामीनावर बाहेरआल्यानंतर त्यांचेवर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांचेवर झाला नाही अगर त्यांचे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसुन ते सातत्याने गुन्हे करीत होते तसेच त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्याने अशा गुन्हेगारांवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

वरील टोळीला मा. समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होवुन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये सातारा जिल्हयातुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.नोव्हेंबर २०२२ पासुन १३ उपद्रवी टोळयांमधील ४२ इसमांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक, सातारा श्रीमती आँचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोना प्रमोद सावंत, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, सातारा शहर पोलीस ठाणेचे पोहवा संदीप पवार,अमोल सापते यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -८००७८५२१२१


Post a Comment

0 Comments