काळज येथे भर दिवसा दरोडा
फलटण/वैभव जगताप
मौजे काळज ता.फलटण,जि.सातारा,येथील दि.०६/१०/२०२३रोजी नागेश बापु डोंबाळे यांच्या राहत्या घरातील दुपारी भर दिवसा १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान घराच्या दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरट्यांनी लाकडी कपाटामधील १ तोळयाचा सोन्याचा गंठण, १तोळा सोन्याचे गोल कानातील फुले व त्याला असलेले दोन झुमके व रोख रक्कम १२०००/-रु. असा मुद्देमाल लांपास केला आहे.
व त्याच दिवशी मध्य रात्रीच्या वेळेस काळज गावच्या हद्दीतील जय मल्हार मेडिकल व संजीवनी मेडीकलचे शटर तोडुन रोख रक्कम (माहिती मिळालेली नाही) चोरीस गेली आहे व हॉटेल जय मल्हारची सुध्दा चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरला ह्या संपूर्ण प्रकरणाची लोणंद पोलीस ठाणे येथे नोंद झाली असून याचा अधिक तपास हवालदार नाळे करत आहेत.
अशा प्रकारे जर दिवसा दरोडा आणि त्याच दिवशी रात्रीच्या दरम्यान व्यवसायकांची चोरी होत असेल तर मग काळजच्या नागरिकांच्या सतर्कतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे कारण ग्रामसुरक्षा दल हे फक्त नावालाच दिसत आहे कारण पोलिस प्रशासनाला ग्रामस्थांचे कसलेही सहकार्य दिसत नाही पोलिस प्रशासन वारंवार सांगत आहे की नागरिकांनी नागरिकांच्याच सुरक्षितेसाठी रात्रीच्या वेळी गस्त घालणे गरजेची आहे परंतु नागरिकांना त्याचे गांभीर्यच नाही कारण ब-याच गावामधील नागरिक पोलिस पाटील व पोलीस प्रशासनाला सहकार्य करताना दिसत नाहीत पोलिस नियंत्रणा ही तुमच्या एका कॉल वर तुमच्या पर्यंत एका क्षणात पोहचण्याचा पर्यंत करत असतात मग आपणच का सतर्कता घेत नाही.
गावाने जर ठरवले तर १५ वित्त आयोगातुन ग्रामसभेच्या ठरावाच्या साह्याने गावामध्ये CCTV फुटेज बसवुन गुन्हेगारीला व दरोडा यासारख्या अनेक गोष्टींना प्रतिबंध करू शकतात.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क: वैभव जगताप
मोबाईल -८००७८५२१२१
Post a Comment
0 Comments