सातारा-लोणंद मार्ग ६ दिवसांकरिता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
फलटण/वैभव जगताप
महाव्यवस्थपक (टनेल विभाग) महारेल पुणे यांचेकडील पत्राप्रमाणे वाठार पोलीस ठाणे हद्दीत सातारा
ते लोणंद या राज्यमार्गावर काळीमोरी रेल्वे पुलाजवळ रेल्वे विभाग पुणे हे नविन रेल्वे पुल बांधत असुन तेथील
सध्याचा वाहतुकीचा पुल हा नविन रेल्वे लाईन तयार करणे कामी निष्कासित करणार आहेत. सदर कामासाठी मध्य रेल्वे विभाग पुणे यांना साधारणपणे १५ दिवसाचा कालावधी लागणार असलेबाबत व सदरचा पुल पाडणेच्या कामाच्यावेळी वाहतुक कोंडी टाळणे, अपघात टाळणे, तसेच सदर कामाच्यावेळी प्रवाशांची गैरसोय होवु नये म्हणुन यासाठी सातारा ते लोणंद या राज्यमार्गावरील वाहतुक बंद ठेवुन पर्यायी मार्गाने वाहतुक वळविणे कळविले आहे.त्या अनुशंगाने पर्यायी मार्गाची उपलब्धता व प्रस्तावित कामाची निकड पाहता सदर मार्गावरील वाहतुक वळविणे अत्यंत आवश्यक आहे. त्याबाबतची अधिसुचना प्रसिद्ध करणेत येत आहे.
श्री. समीर शेख भापोसे, पोलीस अधीक्षक सातारा, मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये वाठार पोलीस ठाणे हदीत सातारा ते लोणंद या राज्यमार्गावर काळीमोरी रेल्वे पुलाजवळ मध्य रेल्वे विभाग पुणे हे नविन रेल्वे पुल बांधत असुन तो अपूर्ण आहे. तेथील सध्याचा वाहतुकीचा पुल काढून टाकण्यात येणार आहे. व दुसरी रेल्वे लाईन टाकण्याचे काम करणेत येणार आहे. यासाठी वाहतुकीत
बदल करून अंतर्गत वाहतुक व्यवस्था सुरळीत राहणेकरीता दि. ०६/१०/२०२३ मे ००.०१ चा पासुन ते १३/१० / २०२३
थे २४.०० पर्यंत खालील अधिसुचना पारित करीत आहे.
वाहतुक मार्गातील बदलाबाबत
वाहतुक मार्गातील बदल खालीलप्रमाणे करण्यात आला आहे.
१) पुणे लोणंद मार्गे साताराकडे तसेच फलटण वरुन साताराकडे येणारी अवजड वाहतुक लोणंद वरुन
खंडाळा / शिरवळ मार्गे पुणे बेंगलोर हायवे वरून साताराकडे जाईल.
२) साताज्याकडून वाढे फाटा ते लोणंदकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूक वाढे फाट्यावरून न वळवता
सरळ पुणे बंगलोर महामार्गाने शिरवळ मार्ग लोणंदकडे जाईल.
३) फलटण वरुन साताराकडे येणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने फौजी ढावा येथुन तडवळे
स.वा. मार्गे पिंपोडे बु. ते वाग्देव चौक, वाठार स्टेशन मार्गे सातारा कडे जातील,
४) लोणंद-सालपे मार्गे येणारी हलकी व दुचाकी वाहने तडवळे स.वा. मार्गे पिंपोडे यु. ते वाग्देव चौक,
बाठार स्टेशन मार्गे सातारा/कोरेगांव कडे जातील.
५) सातारा / कोरेगांव कडुन लोणंद व फलटण बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने
वाग्देव चौक वाठार स्टेशन मार्गे पिंपोडे बु. ते तडवळे स.या. ते लोणंद / फौजी ढाबा मार्गे फलटण
कडे जातील.
६) आदर्की फाटा येथील फौजी ढाबा ते वाग्देव चौक, वाठार स्टेशन हा रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील
तरी वरील वाहतुक ज्या ज्या ठिकाणावरून वळविण्यात आली आहे. अशा ठिकाणी दिशा दर्शक फलक लावण्यात आलेले आहेत व आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वरील वाहतुक मार्गात केलेल्या बदलांसाठी सर्व नागरीकांनी व वाहन चालकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क: वैभव जगताप
मोबाईल -८००७८५२१२१
Post a Comment
0 Comments