Type Here to Get Search Results !

महावितरणच्या विजेच्या तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटने खामगाव येथील ६एकर ऊस जळून खाक!





 महावितरणच्या विजेच्या तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटने खामगाव येथील ६एकर ऊस जळून खाक! 




प्रतिनिधी /दादा जाधव 

खामगाव मधील शेतकऱ्याचा महावितरणच्या विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किटने सहा एकर ऊस जळून खाक ,घटनास्थळी महावितरणचे मा.जाधव साहेब यांची भेट 



           खामगाव ता फलटण येथील वारे वस्तीवरील शेतकरी रामराव नारायण वारे यांच्या जमीन गट नंबर १२९/२,१२९/३ यामधील २ एकर व गट नंबर २८४ मधील ४ एकर तोडणीस आलेला ऊस

महावितरणच्या विजेच्या तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटने जळाला आहे

          तोडणीस आलेला ६ एकर क्षेत्रातील ऊसाला विजेच्या तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटने दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आग लागून यामध्ये शेतकरी रामराव नारायण वारे यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले असून या झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाकडून मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

 घटनास्थळी महावितरणचे मा.जाधव साहेब यांनी भेट देऊन महावितरण कडून सर्व शेतकरी रामराव वारे यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क: वैभव जगताप 

मोबाईल -८००७८५२१२१

Post a Comment

0 Comments