Type Here to Get Search Results !

बोगस नंबरप्लेट लावलेली चोरीची बुलेट कराड वाहतूक शाखेच्या ताब्यात.

 बोगस नंबरप्लेट लावलेली चोरीची बुलेट कराड वाहतूक शाखेच्या ताब्यात.


फलटण/वैभव जगताप 

दिनांक 27.10.2023 रोजी नेमण्यात आलेल्या कर्तव्यावरील अमंलदार पो हवा अमोल तातोबा पवार व नं 275 यांना तसेच सोबत होमगार्ड जंगम यांना मा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर कर्तव्याकरीता नेमण्यात आलेले होते.

सदर वेळी वाहतूक नियमन व वाहन चेकिंग करीत असताना संबधित अमंलदार यांनी समोरून येणारे ब्लॅक कलरची बुलेट वरील चालक यांना इशारा करून बाजूला घेतले. सदर चालकास त्याचे नांव व बुलेट बद्दल व तिचे कागदपत्राबाबत माहिती विचारली असता सदर चालक यांने आपले नांव सलीम ईलाही डांगे वय 48 वर्षे व्यवसाय वाहन खरेदी-विक्री रा मसूर ता कराड जि सातारा असे सांगून नमूद बुलेट बाबत उडवाउडवीची व असामाधानरकारक उत्तरे दिल्यामुळे व सदर बुलेट चोरीची असावीअसा संशय निर्माण झालेमुळे सदर बुलेट बाबत आरटीओ कार्यालय, कराड येथून सविस्तर माहिती घेतली असता सदर वाहनाचा मूळ क्रमांक एम एच 12 एम डी 0044 असा व सदर बुलेट चे मूळ मालक निवृत्ती साहेबराव सुर्वे रा भुगांव पिगरूट पुणे असल्याची माहिती मिळाली होती. अधिक माहिती घेता सदरची बुलेट चोरीची असून त्याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं 295/2020 भादवि कलम 379 प्रमाणे दिनांक 31.08.2020 रोजी गुन्हा दाखल असल्याबाबतची माहिती प्राप्त झालेलो आहे. याबाबत पुढील योग्य ती कार्यवाही साठी फलटण शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक, सातारा श्री समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग श्री अमोल ठाकूर, वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी श्री चेतन मछले.पोलीस उपनिरीक्षक श्री दिपक जाधव यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना व मार्गदर्शना प्रमाणे पो हवा श्री अमोल पवार पो हवा संजय मोरे, पो हवा संतोष पाटणकर, होमगार्ड रविराज जंगम यांनी केलेली आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments