राज कास हिल रिसॉर्ट वर पोलिसांचा छापा
फलटण/वैभव जगताप
पेट्री येथील राज कास हिल रिसोर्ट वर पोलीसांनी छाटा टाकुन केली कारवाई रात्री उशीरा पर्यंत
रिसोर्ट मधील हॉलमध्ये वारवारलांसोबत डान्स करणा-यांवर सातारा तालुका पोलीसांची कारवाई
दि.२८/१०/२०२३ रोजी रात्री उशीरा पेट्री ता. जि. सातारा येथील राज कास हिल रिसोर्ट नावचे हॉटेलमधील हॉलमध्ये काही तरुणांनी ६ महिलां आणुन त्यांना बारबाला या संगिताचे तालावर उत्तान कपडयात विभत्स हावभाव करुन अंगविक्षेप करुन नृत्य करीत असलेची माहिती प्राप्त झाली. मा. पोलीसअधिक्षक, सातारा यांनी सदर माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जावुन छापा टाकुन कारवाई करण्याचेआदेश पोलीस निरीक्षक श्री विश्वजित घोडके यांना दिलेने पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सुर्यवंशी यांचे उपस्थित सातारा तालुका पोलीस ठाणे,सातारा शहर पोलीस ठाणेकडील स्टाफसह राज कास हिल रिसोर्टमध्ये दिनांक २८/१०/२०२३ रोजी०१.०० वा. चे सुमारास छापा टाकला असता सदर रिसोर्टमधील हॉलमध्ये ६ बारबाला हॉलमध्ये असलेल्या एकुण १८ पुरुषांचे समोर आळीपाळीने येवून उत्तान कपडयात गि-हाईकांच्या समोर उभ्या राहुन बिभत्स हावभाव करुन गि-हाईकांचे जवळ जाऊन त्यांचेशी लगट करीत होत्या सदर बारवालांच्या कृत्यावर गि-हाईक इसम हे आनंद घेऊन नमुद बारबालांवर भारतीय चलनातील नोटा उडवित होते त्यावेळी राज कास हिल रिसोर्टचे मालक, मॅनेजर व वेटर्स हे पोलीसांची चाहुल लागताच सदर ठिकाणावरुन पळुन गेले असुन हॉलमध्ये नारवारला महिलांसोबत डान्स करीत असलेल्या इसमांना पोलीसांनी जागीच ताब्यात घेतलेआहे व सदर एकुण १८ इसमांचे ताव्यामध्ये एकुण ८२.६९८ /- रुपये रक्कमचा माल त्यामध्ये रोख रक्कम व मोबाईल हॅण्डसेट जप्त केलेले आहेत. तसेच हॉल मधील जीबीएस कंपनीचा साऊंण्ड सिस्टीम व डिस्को लाईट देखील जप्त करण्यात आली आहे. सदर बाबत राज कास हिल रिसोर्टचे मालक, मॅनेजर, वेटर्स व ५८ गि-हाईकांवर सातारा तालुका पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास मा. वरीष्ठांचे सुचनां प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक श्री. दळवी हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. श्री. समीर शेख साो, पोलीस अधीक्षक सातारा, मा. आँचल दलाल मॅडम अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनानुसार तसेच मा. श्री. किरणकुमार सुर्यवंशी उपविभागिय पोलीस अधिकारी सातारा शहर विभाग, सातारा यांचे उपस्थितीत श्री. विश्वजित घोडके पोलीस निरीक्षक, सातारा तालुका, श्री.डी.ए. दळवी, पोलीस उप निरीक्षक, ग.पो.उप निरीक्षक पाटील मॅडम सातारा शहर पो.स्टे. तसेच सातारा तालुका पोलीस ठाणेकडील पो. हवा. मालोजी चव्हाण, सचिन पिसाळ,पो.ना. किरण जगताप, पो.कॉ. शंकर पाचांगणे, सातारा शहर पोलीस ठाणेकडील पो.हवा. निलेश यादव,पो.हवा. महांगडे, पो.कॉ. महांगडे यांनी सदर कारवाई केलेली आहे. सदर कारवाईचे अनुषंगाने मा.पोलीस अधिक्षक सो। सातारा यांनी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment
0 Comments