Type Here to Get Search Results !

सैदापुर येथील सराईत गुन्हेगार अर्जुन दौलत पवार याला सातारा जिल्ह्यातुन दोन वर्षा करिता तडीपार !

 सैदापुर येथील सराईत गुन्हेगार अर्जुन दौलत पवार याला सातारा जिल्ह्यातुन दोन वर्षा करिता तडीपार !

फलटण/वैभव जगताप 



शाहुपूरी पोलीस ठाणेकडुन सराईत गुन्हेगार अर्जुन दौलत पवार रा. सैदापुर ता.जि. सातारा यांस दोन वर्षे करीता सातारा जिल्ह्यातुन हद्दपार सातारा जिल्ह्यामध्ये शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीत शरिराविरुद्धचे व तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार अर्जुन दौलत पवार रा. सैदापुरता.जि.सातारा याचेवर सातारा जिल्ह्यामध्ये दरोडा, जबरी चोरी व मारामारी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने शाहुपुरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री.धनंजय फडतरे साो, यांनी सदर सराईत गुन्हेगारा विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदाकलम 56 प्रमाणे सातारा जिल्ह्यातुन तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे मार्फतीने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सातारा उपविभाग सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी किरणकुमार सुर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा शहर विभाग यांनी केली होती.यातील सराईत गुन्हेगाराकडुन सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांचे शरिराविरुद्धचे तसेच मालमत्तेचे नुकसान करुन गुन्हे करीत होता. त्याचेवर दाखल असले गुन्ह्यामध्ये त्यास अटक व कायदेशीर कारवाई करुन ही तो जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याचेवर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्याचेवर झाला नाही अगर त्याचे गुन्हेगारी कृत्यामध्ये सुधारणा झाली नाही. तसेच त्याचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहिल्याने अशा गुन्हेगारावर सर्वसामान्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.वरिल गुन्हागारास श्री सुधाकर भोसले उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सातारा उपविभाग सातारा यांचे समोर सुनावणी होवुन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 अन्वये सातारा जिल्हातुन 2 वर्षा करिता हद्दपारिचा आदेश पारित केला आहे.या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाचे वतीने मा. अपर पोलीस अधिक्षक सातारा श्रीमती आंचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री. अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे शाहुपूरी पोलीस ठाणे, शाहुपुरी पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार पो.हवा. सचिन माने, पो.कॉ. स्वप्नील पवार, स्वप्नील सावंत व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार पो. हवा. स्वप्नील कुंभार, अमित सपकाळ यांनीयोग्य तो पुराव सादर केला आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -८००७८५२१२१

Post a Comment

0 Comments