Type Here to Get Search Results !

श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी आक्रमक!

 श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी आक्रमक!



प्रतिनिधी/ दादा जाधव 

                

श्री दत्त इंडिया कारखान्याने मागील अंतिम बिल रू.१०० जाहीर केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना सह साखरवाडीतील शेतकरी आक्रमक यावर्षी चा ऊस दर व मागील दुसरा हप्ता रू.३४११ प्रमाणे न दिल्यास ऊस तोड न घेण्यावर साखरवाडी परिसरातील शेतकरी ठाम 



आज दि.२६.१०.२३ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून श्री दत्त इंडिया कारखान्यावर शेतकऱ्यांसह मोर्चा काढण्यात आला होता यावेळी शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते

              स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गेल्या वर्षीचा दुसरा हप्ता शंभर रुपये मान्य नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना सह शेतकरी आक्रमक झाले आहेत यावेळी श्री दत्त इंडिया कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर अजित जगताप यांना निवेदनाद्वारे मागील ऊस बिल रू. ३४११ प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळावे यासाठी मागणी करण्यात आली आहे

              मागील आठवड्यात १६.१०.२३ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने श्री दत्त इंडिया कारखान्यावर मोर्चा काढून मागील बिल रू. ३४११ मिळावे यासाठी मागणी केली होती त्यावर श्री दत्त इंडियाने रू.२७७२ रुपये अदा केले असून मागील रू. १०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे जाहीर केले आहे परंतु हे शेतकरयांना मान्य नसल्याने हा मोर्चा काढल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी सांगितले 

             मागील वर्षीचा दुसरा हप्ता श्री दत्त इंडियाने शंभर रुपये जाहीर करून शेतकऱ्यांची दिवाळी कडू झाली आहे या दसऱ्याला फक्त शेतकऱ्यांना रू.१०० रुपयाचे पाने पुसली गेली आहेत तसेच फलटण तालुक्यातील कोणतेही राजकीय नेते मागील वर्षाचा दुसरा हप्ता व नवीन ऊसदर यावर बोलण्यास तयार नाहीत तसेच आम्ही शेतकरी बांधव  यावेळी ऊस पुरवठा करणार नाही व बाहेरून येणारा ऊस रोखण्यात येईल व शेतकऱ्यांनी गटतट न बघता आपल्या हक्काच्या घामाच्या पैशासाठी एकत्र यावे असे आवाहन असे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी यावेळी सांगितले

          तसेच शेतकरी बांधवांनी यावर्षी चा नवीन ऊस दर जाहीर न केल्यास व मागील दुसरा हप्ता रू.३४११ प्रमाणे न दिल्यास ऊस तोड घेणार नाही बाहेर आलो असे येऊन देणार नाही यावर साखरवाडी परिसरातील शेतकरी ठाम आहोत अशी भूमिका व्यक्त केली

             या मोर्चा वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर,तालुकाध्यक्ष नितीन यादव,पक्ष तालुकाध्यक्ष दादा जाधव,फलटण शहराध्यक्ष सचिन खानविलकर,किरण भोसले,निलेश भोसले,राजेंद्र भोसले,माणिक आप्पा भोसले, बाळासाहेब कुचेकर यांच्यासह साखरवाडी परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते

           तसेच या निवेदनावर श्री दत्त इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर अजित जगताप यांनी कारखाना प्रशासनाच्या वरिष्ठांशी बोलून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले

Post a Comment

0 Comments