Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी संदेश शिपकुले यांची निवड

 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी संदेश शिपकुले यांची निवड

प्रतिनिधी/ तानाजी सोडमिसे


फलटण- तालुक्यातील सोमंथळी येथील युवा कुस्तीपटू संदेश शिपकुले याची सातारा येथे होऊ घातलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ,२१ते२२-१०-२०२३ रोजी पार पडलेल्या   सातारा जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत फलटण तालुक्यातील  आयोजित निवड चाचणीत पै संदेश शिपकुले  ७४ किलो वजन प्रथम माती विभाग  गटातील चमकदार कामगिरी बजावणारा संदेश आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

धाराशिव येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी

 या स्पर्धेसाठी सातारा जिल्हा कुस्तीगीर परिषदेच्या वतीने निवड चाचणी स्पर्धा सातारा तालीम संघ सातारा  येथे रविवारी पार पडली. यात संदेशने अव्वलस्थान पटकावले. त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी त्याच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. संदेश हा सोमंथळी गावचा रहिवासी असून शेतकरी कुटुंबातील आहे. तो सध्या  कुस्ती केंद्र पुणे येथे उप महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या तालमीत सराव करत आहे. २४ वर्षीय संदेशने ग्रामीण भागात राहून कुस्तीमध्ये आपले नाव कमावले आहे. त्याने यापूर्वी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावले.

 कुस्तीगीर परिषदेचे वस्ताद जयदीप गायकवाड, वस्ताद खाशाबा करचे, वस्ताद विकास गुडगे,दत्तू यादव सोमंथळी पंचक्रोशीतील मान्यवरांनी व ग्रामस्थांनी स्वागत केले.

सातारा जिल्ह्याच्या अपेक्षा वाढल्या

यापूर्वी  कुस्तीमध्ये नॅशनल चॅम्पियन किताब पटकावलेला आहे. त्यानंतर संदेश याने सातत्य व परिश्रमाच्या जोरावर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत धडक मारली आहे. त्याच्याकडून सातारा करांना मोठ्या अपेक्षा असून या स्पर्धेकडे कुस्तीेप्रेमींचे लक्ष वेधले आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -८००७८५२१२१

Post a Comment

0 Comments