मौजे सोमंथळी ता फलटण येथील जमीन शिरवळ- लोणंद- फलटण- बारामती राज्यमार्गाच्या चौपदरी करणाच्या पार्श्वभूमीवर सहमती व तडजोडीच्या माध्यमातून भूसंपादन केलेले असे प्रशासन नेहमी सांगत मात्र शेतकऱ्यांना प्रतिगुंठा सरासरी २५ हजार रुपये मोबदला दिला जात आहे. यात धोरणात्मक कोणताही बदल केला जात नाही या पार्श्वभूमीवर सोमंथळी येथील भूसंपादीत शेतकऱ्यांनी उचित भरपाई मिळण्याबाबत जिल्हा न्यायालयात जानेवारी २०१७ मध्ये याचिका दाखल केली. न्यायालयामध्ये जाऊनही कुठल्याही प्रकारचे पूर्वीचे प्रांताधिकारी यांचेकडुन सहकार्य व मार्गदर्शन, पाठपुरावा नसल्या कारणास्तव सहा वर्ष केसेस रेंगाळत पडलेल्या
प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताचे तहसीलदार तुषार देशमुख व बी ए होले यांनी वेळोवेळी, सलग, सातत्य पाठपुरावा करून अत्यंत अल्पकाळात त्यांनी आपल्या धडाडीच्या आणि अभ्यासपूर्वक कार्यातून प्रलंबित केसेसचा प्रश्न सोडविला.
प्रांताधिकारी सचिन ढोले हे फलटणला लाभलेले पहिलेच असे प्रांताधिकारी आहेत की जे सर्वांनाच सहजा सहजी उपलब्ध होतात सर्वांचे कॉल रिसिव्ह करतात. तात्काळ समोरच्या व्यक्तीचे शंका निरसन होईपर्यंत मार्गदर्शन करतात. अत्यंत अल्पकाळात त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण, कार्यातून एक कुशल व कार्यतत्पर लोकप्रिय प्रांताधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केले.
उंडवडीकडे पठार- बारामती- फलटण या ३६कि. मी. अंतराच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० असून महामार्गाचे चौपदरीकरणा साठी भूसंपादन केलेल्या जमिनीचे त्या संपादन झालेल्या संयुक्त मोजणी करून मुख्यत्वे हद्य कायम निश्चित करण्यात आले. त्यासंदर्भात प्रांत अधिकारी म्हटले की सोमंथळी येथील प्रलंबित प्रश्नांबाबत गावामध्ये तातडीने बैठक घेऊन विचार विनिमयातून मार्ग काढून सोमंथळी मध्ये रस्त्याचे काम चालू केले जाईल. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल सोमंथळी पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -८००७८५२१२१

Post a Comment
0 Comments