सोमंथळी येते मोफत कुस्ती प्रशिक्षण शिबीर संपन्न !
प्रतिनिध/ तानाजी सोडमिसे
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलची उत्पत्ती झाल्यापासून तरुणाईची कुस्ती या खेळाच्या रूपाने मातीशी असणारी प्राचीन काळापासून ची नाती कमकुवत तर होत नाहीत ना अशी भीती क्रीडा जगताला वाटत असताना ध्येय वेड्या क्रीडा क्षेत्राला वाहून घेतलेल्या क्रीडा शिक्षक विकास भुजबळ जि. प.प्राथमिक शाळा सोमंथळी ता. फलटण यांनी शाळा व्यवस्थापन समिती व जय हनुमान तालीम सोमंथळी याचे संयुक्त विद्यमान आणि मे प्रवीण मसाले वाले पुणे यांच्या सहकार्याने एक अनोखा नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून मोफत कुस्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित केले.
सोमंथळी मारुतीच्या पद परशाने पावन झालेलं पवित्र गावामध्ये सदर प्रशिक्षण शिबिर दि. ९ ऑक्टोंबर ते १३ ऑक्टोंबर २०२३या सहा दिवसात आयोजित करण्यात आले. मा. सभापती दत्तात्रय गुंजवटे, मा. उपसभापती संजय सोडमिसे, सरपंच किरण सोडमिसे, उपसरपंच तथा अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती लखन यादव, चेअरमन आबाजी शिपकुले व सोमंथळी ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये सदर प्रशिक्षणाची सुरुवात झाली सदर प्रशिक्षण शिबिरामध्ये एकूण ५२ मुले, मुली खेळाडूंनी सहभाग नोंदवला सहभागी प्रशिक्षणार्थीच्या उत्साहाने आणि तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात मा. खाशाबा जाधव यांच्या सारखे ऑलम्पिक खेळाडू तयार होतील असा विश्वास डॉ.महेश पालकर शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांनी प्रशिक्षण शिबिरास सदिच्छा भेट प्रसंगी मनोगत व्यक्त केले.
सदर शिबीर सोमंथळी पंचक्रोशीतील सर्व कुस्ती शौकीन खेळाडूंना सकाळी सहा ते सायंकाळी सात या कालावधीमध्ये पूर्णतः प्रशिक्षण मोफत दिले.यामध्ये सकाळी सहा ते आठ खेळ पूरक व्यायाम साडेआठ ते दहा नाष्टा त्यामध्ये दूध, अंडी, केळी दहा ते बारा तज्ञ कुस्ती कोचांचे मार्गदर्शन पर व्याख्याने ऑनलाइन कुस्त्या पाहणे बारा ते तीन दुपारचे जेवण व विश्रांती तीन ते सहा तज्ञ प्रशिक्षक एन आय एस कोच यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष कुस्त्यांचा सराव सकाळी सहा ते सात अल्प उपहार व समारोप अश्या प्रकारच्या या मोफत प्रशिक्षण शिबिरास ग्रामपंचायत सोमंथळी व श्री मारुती देवस्थान ट्रस्ट, नेहरू युवा मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कुस्ती खेळाचा प्राचीन काळापासून सुवर्ण इतिहास असून हा खेळ फक्त खेळ शिकवतो असे नाहीत तर आयुष्यातील अनेक कोडी सोडवण्यास मदत करतो परंतु इंटरनेटच्या जमान्यात मोबाईलचे पटलावर फिरणारी बोटे मातीच्या पटला वरून फिरल्या शिवाय शरीर शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होऊ शक्य नाही. युवा वर्गाला संधी उपलब्ध करून देणे सोमंथळी सारख्या गावागावात शिबिरे आयोजित केल्यास सुदृढ , बल शाही, युवा वर्ग तयार होण्यासाठी नक्कीच मदत होईल. अशी ग्वाही ,माननीय श्री राजेंश क्षीरसागर उपसंचालक शिक्षण महाराष्ट्र राज्य यांनी त्यांच्या भेटी प्रसंगी व्यक्त केले.
सहा दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरास कुस्ती हाच श्वास मानणारे विविध कुस्ती वस्ताद, कुस्ती निवेदक, मार्गदर्शक, राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळलेले मल्य यांनी उपस्थिती लावून उद्याच्या होऊ घातलेल्या युवा मल्लांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यावेळी पोपटराव काळे, मा. शिक्षण अधिकारी पुणे कोकरे सर, डायट फलटण चे केंद्रप्रमुख सौ बागडे मॅडम, दारासिंग निकाळजे, अजित कदम सर, तुषार मोहिते सर त्याबरोबर महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान जयदीपजी गायकवाड निलेश बाबुराव लोखंडे एन आय एस कोच विजय होळकर, दीक्षित सर फिटनेस कोच राजाराम, पैलवान पांडुरंग महाराज सोडमिसे , मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी कुस्ती हा खेळ फक्त ताकती वरच खेळला जात नाही तर त्यासाठी कुशाग्र बुद्धी व बुद्धी कोश, सराव नियमित व्यायाम, आहार ,विश्रांती, गुण कौशल्य, कठोर परिश्रमातून साकारलेला खेळ प्रशिक्षणार्थींनी कानमंत्र दिला.
तसेच कुस्ती बद्दलची आवड कुस्ती चे प्रकार डावपेच या गोष्टी प्रात्यक्षिक आत्मसात करून घेतले विविध वयोगटातील मुला मुलींना संधी व भारतीय मुलांनी जागतिक पातळीवर केलेल्या कामगिरीची ओळख करून देऊन शिबिरामध्ये सहभागी असलेल्या युवा वर्गाने या मिळालेल्या संधीचे सोने करून स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करून दाखवणे आजच्या कुस्ती प्रशिक्षण शिबिरा मधील उद्याचे ऑलम्पिक वीर महाराष्ट्र केसरी हिंदकेसरी एशियन चॅम्पियन घडविण्यात नक्कीच मोलाचे योग्य दान करतील याबद्दल तीळ मात्र शंका नाही असा आशावाद ही नामवंत कुस्ती मल्लांनी याप्रसंगी व्यक्त केला सदर प्रशिक्षणाच्या यशस्वीते साठी सोमंथळी तालमीचे वस्ताद खाशाबा करचे, दत्तात्रेय यादव, राम यादव, नितीन शिपकुले, संतोष सोडमिसे, सागर अलगुडे, पो. पा. शिवाजी सोडमिसे, बाळासाहेब यादव यांनी योग्य दान दिले त्या सर्वांचे व मान्यवरांचे आभार दत्तात्रय गोफणे सर व सविता कदम मॅडम यांनी मानले.
सदर कॅम्पला मे प्रवीण मसालेवाले पुणे १२ यांनी मोलाचे सहकार्य करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून व सोमंथळी पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क :वैभव जगताप
मोबाईल -८००७८५२१२१

Post a Comment
0 Comments