Type Here to Get Search Results !

फलटण तहसिलमध्ये ग्राहक पंचायतीचा लोकशाही दिन साजरा

 फलटण तहसिलमध्ये ग्राहक पंचायतीचा लोकशाही दिन साजरा!

प्रतिनिधी/ तानाजी सोडमिसे

अखिल भारतीय ग्राहक पंचायत फलटण व तहसील प्रशासन यांच्या संयुक्तपणे सर्वसामान्य जनतेच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तहसील प्रशासन ग्ॄहामध्ये लोकशाही दिन महिन्याच्या ३ सोमवारी घेण्यात येत. तक्रारीचे जलद आणि प्रभावीपणे निवारण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव यांच्या मार्गदर्शनपर प्रलंबित तक्रारींचे समाधानकारक निवारण करण्यासाठी संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले. प्रलंबित तक्रारींचे समाधानकारक निवारण करुन सुनावणी मध्ये योग्य निर्णय अपेक्षित आहे. समाधानकारक निवारण न झाल्यास जिल्हा लोकशाही दिना मध्ये संबंधित तक्रारी दाखल करण्यात येतील. तक्रार निवारणांचा कालावधी २१ दिवसाचा ठरविला आहे. आज जनतेच्या तक्रारींचे निवारण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक करण्यात आले.  डेंगु, मलेरिया, गोचीड ताप इत्यादी साथीच्या रोगा मुळे नागरिक त्रस्त होत आहेत शहरातील नागरिकांना खाजगी दवाखान्यात पैसे खर्च करावे लागतात यासाठी डास निर्मूलन करून त्याची उत्पत्ती थांबवणे हा प्रतिबंधात्मक पर्याय आहे म्हणून डास निर्मूलनाबाबत औषध फवारणी शहर व शहरालगत करण्याचे आव्हान संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. शंकर मार्केट नजीकच्या दोन्ही शाळा समोरील अस्वच्छता व रहदारीस ,(भाजी विक्रेत्याकडून) अडथळा होत असल्याने पालक व मुलांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होत आहे. राजन बबनराव भोसले यांचा सि.स. नं ४५१ सरकारी जागेबाबत च्या अर्जाचे समाधानकारक निवारण करणे, किसन श्रीपती ढेकळे यांची सि. स.नंबर ४०५७ ची बोळ बंद करण्यास परवानगी मिळावी ग्राहक संघटना व प्रशासन यांच्या सामोपचारातून खेळीमेळीच्या वातावरणात तक्रारींचे निवारण करण्यात आले.

अ.भा. ग्रा. पंचायत फलटणच्यावतीने तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, प्रांत तहसीलदार तुषार देशमुख, नायब तहसीलदार नामदेव काळे, काकडे साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरपालिका उपमुख्य अधिकारी महात साहेब, अ.भा. ग्रा.पंचायतचे अध्यक्ष शंकरराव मोहिते, उपाध्यक्ष किसन ढेकळे, जि. सचिव आप्पासाहेब पिसाळ, ता.सचिव तानाजी सोडमिसे कोषाध्यक्ष राजन भोसले, सहसचिव जगन्नाथ रिटे,संघटक स.रा. मोहिते, सदस्य मारुती पिसाळ व इतर मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वैभव :जगताप 

मोबाईल -८००७८५२१२१

Post a Comment

0 Comments