Type Here to Get Search Results !

वाई पोलिसांच्या कडून आरोपी अविनाश पिसाळ याच्याकडून आणखीन मुद्देमाल जप्त ...

 वाई पोलिसांच्या कडून आरोपी अविनाश पिसाळ याच्याकडून आणखीन मुद्देमाल जप्त ...


फलटण /वैभव जगताप 


अटक आरोपी अविनाश पिसाळ याच्याकडून वाई तपास पथकाने आणखी ०१ पिस्टल व ०१ जिवंत

काडतुस असा एकूण ६५.३०० रुकिंचा मुद्देमाल केला हस्तगत

वाई पोलीस ठाणे गु.र.नं ७६९ / २०२३ शस्त्र अधिनियम ३, ४, २५ वन्यजीव अधिनियम ९,३९,५०,५१

अन्वये वाई पोलीस ठाणे येथे आरोपी नामे अविनाश पिसाळ याचेवर गुन्हा दाखल असुन, त्याचे राहते घरावर

स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी छापा मारुन ०३ पिस्टल ०२ गावठी कट्टे ७८ जिवंत काडतुस व २७०

रिकाम्या काडतुसाच्या पुंगळ्या, वन्य प्राण्यांचे अवशेष हस्तगत करुन पुढील तपास वाई पोलिस ठाणेचे पोलीस

निरीक्षक श्री बाळासाहेब भरणे यांचे अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांचेकडे सोपविण्यात

आला. यातील आरोपीकडे अधिकचा तपास करुन त्यास विश्वासात घेऊन त्याने बावधन येथील त्याचे जनावरांचे

गोठ्यात लपवुन ठेवलेले ०१ पिस्टल व ०१ जिवंत काडतुस त्याचेकडुन हस्तगत करण्यात आले आहे.

माहे नोव्हेंबर २०२२ ते आज अखेर सातारा जिल्ह्यामध्ये शस्त्र अधिनियम अंतर्गत २९ गुन्हे दाखल

असुन त्यामध्ये एकुण ५९ अग्निशस्त्रे, १६१ जिवंत काडतुसे, ३७० काडतुसांच्या रिकाम्या पुंगळ्या हस्तगत

करण्यात आलेल्या असुन एकुण ८४ आरोपीवर कारवाई करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक सो श्री. समिर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो श्रीमती

आंचल दलाल मॅडम मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो वाई विभाग श्री. बाळासाहेब भालचिम यांचे

मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. बाळासाहेब भरणे पोलीस निरीक्षक वाई पोलीस

ठाणे, पोलीस उप निरीक्षक श्री सुधिर वाळुंज, पोलीस हवालदार राहुल भोईर, अजित जाधव पोलीस अंमलदार

हेमंत शिंदे श्रावण राठोड, नितीन कदम, प्रेमजीत शिर्के, गोरख दाभाडे यांनी केली आहे. मा पोलीस अधिक्षक सो

श्री समीर शेख व मा. अप्पर पोलीस अधिक्षक साो श्रीमती आंचल दलाल मॅडम यांनी वाई पोलीसांचे अभिनंदन केले आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121




Post a Comment

0 Comments