साखरवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा...!
फलटण/वैभव जगताप
मौजे साखरवाडी ता. फलटण जि. सातारा येथील श्री रमेश कुचेकर सर यांची सुकन्या कुमारी प्राजक्ता रमेश कुचेकर हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन तिची कृषी मंडल अधिकारी पदी वर्णी लागली आहे. पहिल्यापासूनच होतकरू अभ्यासू कष्टाळू जिद्दी असा तिचा स्वभाव असल्याकारणाने ती शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात अग्रेसर राहिलेली आहे
तिने राष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेऊन10 वेळा सुवर्ण व 2 वेळा रोप्य पदक मिळविले आहे 2014 साली तिचा सातारा जिल्हा गुणवंत खेळाडू म्हणून सन्मान करण्यात आलेला होता. मुळातच वडील हे प्राथमिक शिक्षक असल्यामुळे शैक्षणिक संस्कारांची जडणघडण घडत गेल्यामुळे आणि ती असतानाच सुसंस्कारी होतकरू असल्याकारणाने शिक्षणाची जबाबदारी पार पाडत गेली. तिच्या ह्या घवघवीत यशाबद्दल साखरवाडी व पंचक्रोशीतून तिला शुभेच्छांचा व आशीर्वादाचा वर्षाव होत आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments