Type Here to Get Search Results !

भुईंज पोलीस ठाणे यांची धडाकेबाज कारवाई

  भुईंज पोलीस ठाणे यांची धडाकेबाज कारवाई ....!

फलटण /वैभव जगताप 


हायवे रोडने जाणा-या वाहन चालकांना मध्यरात्री तीनपानी काला पीला नावाचा जुगार खेळवून

त्यांची फसवणुक करणा-या टोळीला भुईंज पोलीसांकडुन अटक, ७ जणांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन

४ लाख १९ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.)

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा

यांनी जिल्हयातील अवैध धंदयाविरुध्द प्रभावी कारवाया करुन त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत सुचना

दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे भुईंज पोलीस ठाणे मार्फत अवैध धंदयाविरुध्द कारवाईची मोहिम सुरु आहे.

१ नोव्हेंबर २०२३ रोजी रमेश गर्जे, सपोनि भुईंज पोलीस ठाणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत

बातमी मिळाली की, आनेवाडी तालुका - जावली गावचे हददीत टोल नाक्याच्या पुढील बाजुस आनेवाडी

पुलाचेजवळ, हायवे रोडचे कडेला मध्यरात्रीच्या सुमारास काही इसम हायवे रोडने जाणा-या वाहन

चालकांना तीनपानी काला पीला नावाचा जुगार खेळवुन त्यांची फसवणुक करीत आहेत. अशी माहिती

मिळाल्याने सदर माहितीचे अनुषंगाने भुईंज पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस

अधिकारी व अंमलदार तसेच दोन पंचांना बोलावुन त्यांना मिळालेल्या बातमीची माहिती देवुन त्यांचेसह २

नोव्हेंबर २०२३ रोजी मध्यरात्री ०१.१५ वा. छापा टाकला असता सदर ठिकाणी काही इसम हायवे रोडचे

कडेला टेबल लावुन बॅटरीच्या उजेडात हायवेने जाणा-या वाहन चालकांना थांबवुन त्यांना तीनपानी काला

पीला नावाचा जुगार खेळवताना दिसले, तेथे हजर असणा-या एकुण ७ इसमांना रेड पार्टीतील अधिकारी

व अंमलदार यांनी ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन १० हजार रुपये रोख रक्कम, १ पांढरे रंगाची मारुती

८०० कार, १ अॅक्टीव्हा मोटारसायकल, ८ मोबाईल फोन तसेच जुगाराचे साहीत्य असा एकुण ४ लाख

१९ हजार ४० रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपींची नावे 

१. अक्षय सयाजी सोनावणे, वय-२९ वर्षे, रा. विरमाडे, ता. वाई

२. हरीश्चंद्र मखनलाल पटेल, वय-३३ वर्षे, रा. करंजेपेठ, ता. जि. सातारा, मुळ रा. कुलारवर, जिल्हा

फतेप्पुर, राज्य - उत्तरप्रदेश.

३. रविकुमार रामरतन सिंग, वय-३७ वर्षे, रा. मरीनड्राईव्ह, मुंबई मुळ रा. टाटानगर, जमशेदपुर, झारखंड.

४. विजय सखाराम यादव, वय - ४२ वर्षे, रा. गोळीबार मैदान, सातारा, मुळ रा. कोंढवेता. जि. सातारा

५. राजु भगवानदेढे, वय-५५ वर्षे, रा. महात्माफुलेवाडी, वडाळा मुंबई

६. बाळु भगवान राजगुरु, वय-५५ वर्षे, रा. टाकळी मानुर, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर

७. कृष्णा नतिमाप्पा शेटे, वय- ४३ वर्षे, रा. चिंचपाडा, कल्यान जि. ठाणे

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक

सातारा, श्री. बाळासाहेब भालचीम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांचे मार्गदर्शनाखाली भुईंज

पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, गुन्हे प्रकटीकरण शाखा भुईंज कडील पोलीस उप-

निरीक्षक विशाल भंडारे, पोलीस अंमलदार राजाराम माने, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, किरण

निंबाळकर, राजेश कांबळे, सुहास कांबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला असुन सहभागी अधिकारी

व अंमलदार यांच पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच उपविभागीय पोलीस

अधिकारी वाई यांनी अभिनंदन केले आहे.

यापुढे देखील भुईंज पोलीस स्टेशन मार्फत अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन करणेसाठी प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments