Type Here to Get Search Results !

साखरवाडीतील चॉकलेट फॅक्टरीतील भंगार चोर पोलिसांच्या ताब्यात.

 साखरवाडीतील चॉकलेट फॅक्टरीतील भंगार चोर पोलिसांच्या ताब्यात.

फलटण/वैभव जगताप 


साखरवाडी हे औद्योगिक दृष्ट्या पुढारलेले गाव असून पूर्वी त्या ठिकाणी साखर कारखाना व चॉकलेट

फॅक्टरी असे उद्योग होते. त्या उद्योगावर अवलंबून असणारे आणखी इतर उद्योग होते 3त्यातील चॉकलेट

फॅक्टरी ही 2017 साली बंद पडलेली आहे. त्या बंद पडलेल्या चॉकलेट फॅक्टरी चा परिसर अतिशय मोठा आहे.

संपूर्ण फॅक्टरी राखण्यासाठी पूर्वी फक्त एक वॉचमन होता. याचा फायदा घेऊन काही गुन्हेगारांनी सदर

फॅक्टरीत असणारे तांब्याचे पाईप वेळोवेळी चोरून नेऊन. तांबे भंगार मध्ये विकलेले आहे.

सदर बाबत फॅक्टरी मॅनेजर ऋषिकेश चंद्रकांत बनकर वय 35 धंदा नोकरी राहणार साखरवाडी तालुका

फलटण यांनी दिनांक दोन नोव्हेंबर रोजी चॉकलेट फॅक्टरी खिडकी दरवाजे मधून प्रवेश करून अज्ञात इस्मानी

घरपोड़ी करून फॅक्टरीतील भंगार चोरून नेल्या बाबतचा गुन्हा क्रमांक 1615/2023 कलम 454, 457,380

प्रमाणे दाखल केला.

सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हा हा अटक आरोपी विष्णू उत्तम बोडरे वय वीस वर्ष राहणार

साखरवाडी याने त्याच्या इतर पाच साथीदाराबरोबर वेळोवेळी भंगार बाहेर काढून केलेला असल्याचे निष्पन्न

झाले. सदरचे भंगार त्याने खामगाव मधील किसन सुरेश जाधव वय 24 वर्ष राहणार खामगाव या भंगार

विक्रेत्याला घातल्याचे निष्पन्न झाले त्याच्याकडून 110 किलो तांबे हे हस्तगत करण्यात आलेले आहे तसेच

त्याला सुद्धा भादवी कलम 411 प्रमाणे आरोपी करून अटक करण्यात आलेली आहे.

सदर फॅक्टरीचे मालक आपटे यांनी माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी संपर्क करून सदर

गुन्हा बाबत माहिती दिली होती. त्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक यांनी सदरचा गुन्हा उघड करण्याबाबत

फलटण ग्रामीण पोलिसांना सक्त आदेश दिले होते.

सदरचा गुन्हा माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय

पोलीस अधिकारी राहुल धस, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक

सागर आरगडे ,सहाय्यक पोलीस फौजदार मोहन हंगे, पोलीस हवालदार नितीन चतुरे, पोलीस नाईक अमोल

जगदाळे, श्रीनाथ कदम, पोलीस शिपाई श्रीकांत खरात, हनुमंत दडस गणेश यादव चालक योगेश रणपिसे संदीप मदने यांनी केलेली आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments