स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची दुहेरी जबरदस्त कारवाई .
फलटण/वैभव जगताप
दरोडयाच्या तयारीत असणाऱ्या पोलीस अभिलेखावरील आरोपींना कराड येथे जेरबंद करुन
त्यांच्याकडून २ देशी बनावटीची पिसटल, १ गावठी कट्टा, ६ जिवंत काडतुसे व एक लोखंडी टॉमी
असा १,७१,५१०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. तसेच दिव्यनगरी सातारा येथील एका इसमास
पकडून त्याच्या ताब्यातून १ गावठी कट्टा व २ जिवंत काडतुसे असा ४०, ६०० /- रुपये किंमतीचा
मुद्देमाल जप्त.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक
सातारा यांनी सातारा जिल्हयाचे पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून काही
आक्षेपार्ह हालचाली दिसून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या तसेच बेकायदेशिर शस्त्र
बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना श्री अरुण देवकर पोलीस
निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे अरुण देवकर पोलीस निरीक्षक
यांनी रविंद्र भोरे सहायक पोलीस निरीक्षक व पतंग पाटील, अमित पाटील पोलीस उपनिरीक्षक यांच्या
अधिपत्त्याखाली विशेष तपास पथक तयार केलेले आहे.
दिनांक ०३/११/२०२३ रोजी श्री अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा,
स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी अंमलदार तसेच कराड शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस
अधिकारी व अंमलदार कराड शहरामध्ये कोंबींग ऑपरेशन करीत असताना श्री अरुण देवकर पोलीस
निरीक्षक यांना त्यांचे बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, छ. शिवाजी स्टेडीयम जवळील
उत्तरालक्ष्मी देवीचे मंदिरासमोरील झाडाझुडपाच्या आडोशास काही इसम जमले असून ते दरोडा
टाकण्याच्या तयारीत आहेत अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावून रात्री ९.३०
वा. सुमारास छापा टाकून पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार १) परशुराम उर्फ परशा रमेश करवले
रा. सोमवार पेठ कराड २) निशिकांत निवास शिंदे रा. शनिवार पेठ कराड ३) तुषार
उर्फ बारक्या
सुभाष थोरवडे रा. बुधवार पेठ कराड ४) आकाश उदय गाडे रा. बुधवार पेठ कराड ५) एक
अनोळखी इसम (पळून गेलेला) असे संशईतरित्या उभे असल्याचे दिसल्याने नमुद चौघांना जागीच
पकडून त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात २ देशी बनावटीची पिस्टल, १ गावठी कट्टा, ६
जिवंत काडतुसे व एक लोखंडी टॉमी, काळा मास्क, हॅन्डग्लोज, मिर्ची पुडीचे पाकीट असा एकुण
१,७१,५१० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत
असलेल्या स्थितीत मिळून आले असल्याने त्यांच्या विरुध्द
आले असल्याने त्यांच्या विरुध्द कराड शहर पोलीस ठाणे गुरनं
१९९९/ २०२३ भादंवि कलम ३९९,४०२ सह शस्त्र अधिनियम कलम ३ (१), २५ प्रमाणे गुन्हा नोंद
करण्यात आला आहे.
तसेच दिनांक ०३/११/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांना, दिव्यनगरी
ता. जि. सातारा येथील एका इसमाकडे गावठी बनावटीचा कट्टा आहे अशी माहिती मिळाल्याने त्यांनी
सहायक पोलीस निरीक्षक श्री रविंद्र भोरे व त्यांच्या पथकास नमुद ठिकाणी जावून छापा टाकून
कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे रविंद्र भोरे यांनी मिळाले बातमीचे ठिकाणी छापा टाकुन
इसम नामे अभिजीत मनोज घाडगे रा. जिव्हाळा कॉलनी दिव्यनगरी शाहुपूरी सातारा यास ताब्यात
घेवून त्याच्या ताब्यातून १ गावठी बनावटीचा कट्टा व २ जिवंत काडतुसे असा एकुण ४०,६०० /- रुपये
किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन सातारा तालुका पोलीस ठाणे गुरनं ४९४ / २०२३ शस्त्र अधिनियम
कलम ३ (१), २५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
माहे नोव्हेंबर २०२२ पासून आत्तापर्यन्त एकुण ६३ देशी बनावटीचे पिस्टल / कट्टे
(अग्नीशस्त्रे), १६७ काडतुसे, ३७७ रिकाम्या पुंगळया जप्त करण्यात आलेले आहे.
सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर
पोलीस अधीक्षक सातारा, यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा
सातारा, श्री प्रदिप सुर्यवंशी पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखेकडील
सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास
शिंगाडे, अमित पाटील कराड शहर पोलीस ठाण्याचे पोउनि राजु डांगे स्थानिक गुन्हे शाखेकडील
पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण
जगधने, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, प्रविण फडतरे, सनी आवटे, अमित माने, गणेश कापरे, अमित
सपकाळ, प्रमोद सावंत, स्वप्नील कुंभार, अविनाश चव्हाण, ओमकार यादव, विक्रम पिसाळ, मोहन
पवार, अरुण पाटील, विशाल पवार, प्रविण पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव,
मयूर देशमुख, संकेत निकम, शिवाजी गुरव, संभाजी साळुंखे, पंकज बेसके, अमृत कर्पे सायबर
विभागाचे अभिजीत शिवथरे, अमित झेंडे, अजय जाधव, कराड शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस
अंमलदार देवकुळे, काळे, कोळी, पाडळे, मोरे, देशमुख, सांडगे, जाधव यांनी सहभाग घेतला असुन
कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती
आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments