पुसेगाव पोलिसांची दमदार कामगिरी ...!
फलटण/वैभव जगताप
पुसेगाव पोलीस ठाणे यांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी सारख्या सातारा
जिल्हयातील एकूण २९ गुन्हयात फरारी असलेला आरोपी पकडून केले जेरबंद )
श्री. समीर शेख, मा.पोलीस अधीक्षक सोो. सातारा, श्रीमती आंचल दलाल सोो. मा. अप्पर
पोलीस अधीक्षक सोो. सातारा यांनी पोलीस ठाणेस दाखल असलेल्या आणि वेळोवेळी मालमत्तेचे
गंभीर गुन्हे करीत असलेले व मिळून येत नसलेले पाहीजे आरोपींची माहीती काढून त्यांचेवर
कारवाई करण्याच्या सुचना आशिष कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पुसेगाव पोलीस ठाणे यांना
दिलेल्या होत्या.
दिनांक ०४.११.२०२३ रोजी आशिष कांबळे, स.पो.नि. पुसेगाव पोलीस ठाणे यांना गोपनीय
बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, मौजे वर्धनगड, ता. खटाव येथे आरोपी नामे अभय
झाकीर काळे मूळ राहणार मोळ, ता. खटाव जि. सातारा हा वर्धनगड परीसरात येणार असलेची
माहीती मिळाली होती. सदरची गोपनीय माहीती मिळालेने पुसेगाव पोलीस ठाणेकडील एक तपास
पथक तयार करून मौजे वर्धनगड येथे नमूद आरोपीचा शोध घेत असता एका घराचे आडोशाला
सदरचा आरोपी दबा धरून बसलेला दिसताच पोलीसांनी त्यास सर्व बाजूंनी घेराव टाकला असताना
आपलेकडे पोलीस येत आहेत याची चाहूल लागताच आरोपी अभय झाकीर काळे हा पळून जाण्याचा
प्रयत्न करू लागला त्याने गावातील घरांचा आडोसा घेत पोलीस पाठलाग पोलीस पथकाने करून
आरोपी अभय झाकीर काळे याला पकडून ताब्यात घेतले आहे.
सातारा जिल्हयातील पुसेगाव पोलीस ठाणे १८ गुन्हे, कोरेगाव पोलीस ठाणे १ गुन्हा, औंध
पोलीस ठाणे २ गुन्हे, वडूज पोलीस ठाणे १ गुन्हा, दहिवडी पोलीस ठाणे १ गुन्हा, म्हसवड पोलीस
ठाणे १ गुन्हा, उंब्रज पोलीस ठाणे १ गुन्हा, फलटण शहर पोलीस ठाणे १ गुन्हा, सातारा शहर
पोलीस ठाणे २ गुन्हे, कराड शहर पोलीस ठाणे १ गुन्हा असे दाखल मालमत्तेच्या गंभीर गुन्हयातून
ब-याच कालावधीपासून फरार असलेला आरोपी अभय झाकीर काळे यास पुसेगाव पोलीसांनी
शिताफीने पकडून सदर कारवाई केली आहे. सदर कारवाईमुळे भविष्यात घडणा-या घर फोडया,
चो-या यासारख्या मालमत्तेच्या गंभीर गुन्हयांना सातारा जिल्हयात आळा बसणार आहे.
श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक
सातारा, श्री.राजेंद्र शेळके, उपविभागिय पोलीस अधिकारी, कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि.
- आशिष कांबळे, पोलीस हवालदार योगेश बागल, पोलीस नाईक सुनिल अबदागिरे, प्रमोद कदम,
अशोक सरक, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश घाडगे, अमोल जगदाळे, महीला पोलीस कविता बरकडे,
होमगार्ड सुरेंद्र काटकर यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई पथकातील अधिकारी व
अंमलदार यांचे श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक व श्रीमती आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments