कराड शहर डि बी पथकाची दमदार कामगिरी...!
फलटण/वैभव जगताप
कराड शहर डीबी पथकाची कामगिरी अपहरण करुन खुन
करणाऱ्या गुन्हेगारानां अवघ्या 02 तासात केली अटक
मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो. सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सो. सातारा मा.
उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री. अमोल ठाकुर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.
प्रदीप सुर्यवंशी सो कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ओगलेवाडी पोलीस दुरक्षेत्रचे प्रभारी
सहायक पोलीस निरीक्षक श्री. संदीप शितोळे सो, पोलीस उप निरीक्षक श्री. आर. एल. डांगे व डीबी पथकाने
अपहरण करुन खुन करणाऱ्या गुन्हेगारास 02 तासाचे आत केली अटक.
कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील ओगलेवाडी परीसरातील राजमाची हजारमाची भागात प्रेम प्रकरणातुन
एका इसमाचा खुन झाला सदर बाबत कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमुद
गुन्हयातील आरोपीना कराड शहर डी बी पथकाने अवघ्या 02 तासात लोकेशन व गोपनिय बातमीदारचे मदतीने
अटक केली आहे. हकीकत अशी की, आरोपी बाबासाहेब पवार रा. हजारमाची ता. कराड यांची मुलगी राजमाची
गावात राहणारा प्रविण पवार याचेसोबत पळून गेल्याचा संशय होता.. सदर प्रकरणाची माहिती आरोपी
बाबासाहेब पवार व त्यांचे इतर साथीदार नातेवाईक यांना मिळाली होती. त्यामुळे सदरचे आरोपी हे त्या युवकाचे
मागोव्यावर होते. दिनांक 30/10/2023 रोजी सकाळी 10.15 वा.चे दरम्यान आरोपी बाबासाहेब याची मुलगी व
युवक हे यशंवतराव चव्हाण कॉलेज परिसरातुन पळुन गेले. त्याचा राग मनात धरुन आरोपी बाबासाहेब पवार रा.
हजारमाची ता. कराड जि. सातारा हा व त्याचे साथीदार यांनी युवकाचे वडील, भाऊ व पळुन जाण्यास मदत केली
असा संशय असलेले मयत इसम जनार्धन गुरव यांना राजमाची गावातुन अपहरण करुन सुर्ली घाटात नेवुन
मारहाण केली सदर मारहाणीत जनार्धन गुरव हा इसम मृत्युमुखी पडल्याने आरोपी रानावनात पसार झाले होते.
सदर आरोपीना कराड शहर डी. बी. पथकाने अवघ्या 02 तासात लोकेशन व गोपनिय बातमीदारचे
मार्फतीने एकुण 06 आरोपीत यांना अटक केली असुन बाकी आरोपीत यांचा शोध सुरु आहे. अटक आरोपीत
यांना दिनांक 06/11/2023 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक आंचल
दलाल सो. सातारा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो., मा.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक
पोलीस निरीक्षक संदीप शितोळे सो, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक डांगे सो, पोलीस
उपकनिरीक्षक पवार, सफौ संजय देवकुळे पोलीस हवा. सचिन सुर्यवंशी, शशि काळे, पोलीस नाईक
संतोष पाडळे, कुलदिप कोळी, पो. शि. धिरज कोरडे, महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश
मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments