Type Here to Get Search Results !

घरफोडी चोरीचा गुन्हा 12 तासात उघड करून आरोपींना दोन वर्षाकरिता केले तडीपार.

सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

घरफोडी चोरीचा गुन्हा 12 तासात उघड करून आरोपींना दोन वर्षाकरिता केले तडीपार.


 (स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांच्या कारवाईचा डबल धमाका)

( पोलीस अभिलेखावरील आरोपींकडून घरफोडी चोरीचा गुन्हा १२ तासाचे आत उघड करुन चालू बाजारभावाप्रमाणे

१,५०,०००/- रुपये तांब्याच्या तारा हस्तगत व दोन वर्षाकरीता सातारा जिल्हयातून हद्दपार असलेला इसम ताब्यात

घेवून त्याचेविरुध्द म.पो. का. क १४२ अन्वये कारवाई.)

दि.२२/०३/२०२४ रोजी २०.०० वा. ते दि. २३/०३/२०२४ रोजी ०५.०० वा. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सातारा

शहरातील करंजेपेठ येथील समर्थ भांडी दुकानाचा पत्रा उचकटून आतमध्ये प्रवेश करुन चालू बाजारभावाप्रमाणे

१,५०,०००/- रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा फिर्यादी यांचे संमतीशिवाय चोरी करुन नेले होते म्हणून वगैरे दिले

मजकुरचे फिर्यादी वरुन शाहुपूरी पोलीस ठाणे गु.र.नं. १६६ / २०२४ भादविक ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंद करण्यात

आला होता.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी

पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपींबाबत माहिती

प्राप्त करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रोहित

फार्णे यांचे अधिपत्याखाली तपास पथक तयार करुन त्यांना नमुद गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. सदरचे

तपास पथकाने घटनास्थळी भेट देवून तेथील तसेच आजूबाजूचे साक्षीदार यांचेकडे विचारपूस करुन तसेच तांत्रिक

विश्लेषनाचे आधारे आरोपींबाबत माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला परंतू काही मिळून आली नाही.

दि.२३/०३/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती

प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी १) अभिषेक उर्फ सोमनाथ गणेश आवारे रा. कोंडवे ता. जि. सातारा,

२) ओंकार संदिप थोरात रा.मोळाचा ओढा सातारा, ३) रोहन विलास थोरात रा. मतकर कॉलनी सातारा यांनी

सदरचा गुन्हा केला आहे, प्राप्त झाले माहितीचे अनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी तपास पथकास

नमुद इसमास ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तपास पथकाने नमुद आरोपींच्या

ठावठिकाण्याबाबत माहिती प्राप्त करुन त्यांना मोळाचा ओढा येथून ताब्यात घेवून नमुद गुन्हयाचे अनुशंगाने

त्याचेकडे विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगून चोरी केलेल्या चालू बाजारभावाप्रमाणे

१,५०,०००/- रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा हस्तगत करुन १२ तासाचे आत घरफोडीचा चोरीचा गुन्हा उघड केला.

तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सातारा यांनी २ वर्षाकरीता सातारा

जिल्हयातून हद्दपार केलेला सॅमसन उर्फ बॉबी अॅन्थनी ब्रुक्स रा. १५१ केसरकरपेठ सातारा हा हद्दपार प्राधिकरणाचे

परवानगी शिवाय क्षेत्र माहुली सातारा येथे आढळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचे विरुध्द सातारा शहर

पोलीस ठाणे गु.र.नं.३०३/२०२४ म.पो.अ.क. १४२ अन्वये नोंद केला आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे

मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस

उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ,

संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, अमित माने, अरुण

पाटील, स्वप्नील कुंभार, अविनाश चव्हाण, अजय जाधव, अमित झेंडे, गणेश कापरे, ओंकार यादव, मोहन पवार,

पृथ्वीराज जाधव, विशाल पवार, रोहित निकम, वैभव सावंत, सचिन ससाणे, मयुर देशमुख, शिवाजी गुरव यांनी

सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक,

सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments