Type Here to Get Search Results !

14 वर्षापासून घरपोडी प्रकरणातील फरार असलेला आरोपी लोणंद पोलिसांनी शिताफीने पकडला.

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

14 वर्षापासून घरपोडी प्रकरणातील फरार असलेला आरोपी लोणंद पोलिसांनी शिताफीने पकडला.


14 वर्षापासुन घरफोडीमधील फरारी असलेला आरोपी जेरबंद करण्यात लोणंद पोलीस स्टेशनला यश.

आगामी लोकसभा निवडणुक अनुशंगाने मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक

सातारा, मा. आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस रेकॉर्डवर असलेले पाहीजे

व फरारी आरोपींची शोध मोहीम घेणेबाबत मार्गदर्शन केले होते त्याप्रमाणे लोणंद पोलीस स्टेशनचे

प्रभारी अधिकारी सपोनि श्री सुशिल बी. भोसले यांनी पाहीजे व फरारी आरोपींना अटक करणेकामी

विशेष मोहीम राबवली आहे.

लोणंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर 98 / 2010 भादवि. 457, 380 प्रमाणे

दाखल आहे. सदर गुन्हयातील आरोपी नामे चोच्या ऊर्फ शुभम राज्या शिंदे वय 38 रा. शेळकेवस्ती

लोणंद ता. खंडाळा जि. सातारा याने गुन्हा केलेपासुन तो अदयपर्यंत फरारी होता. सदर आरोपीचा

शोध घेणेकामी सपोनि श्री सुशिल भोसले यांनी वरीष्ठांचे मागदर्शनाखाली पोहवा संतोष नाळे बनं.

1200, पोहवा. नितीन भोसले बनं. 473, पोना बापु मदने बनं. 1151, पोकॉ. विठठल काळे बनं.

1483, पोकॉ. अभिजित घनवट बनं. 2395, यांचे पथक नेमले होते.

आरोपी चोच्या ऊर्फ शुभम राज्या शिंदे हा त्याचे घरी दिनांक 26/3/2024 रोजी

येणार असल्याची माहीती मिळाल्याने सपोनि श्री सुशिल भोसले यांचे मागदर्शनाखाली वरील

पथकातील अंमलदार यांनी शेळकेवस्ती लोणंद येथे त्याचे घराचे आजुबाजुला सापळा रचला.

सकाळी 9.00 वाजताचे सुमारास फरारी आरोपी चोच्या ऊर्फ शुभम शिंदे हा घरी आला त्यावेळी

पथकातील अंमलदार यांनी एकाचवेळी कारवाई करुन अचानक त्याचे घरी झडप टाकली व फरारी

आरोपी चोच्या ऊर्फ शुभम शिंदे याला ताब्यात घेतला. त्याला पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचे

अटकेची कारवाई केली व त्यानंतर आरोपीस मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधीकारी सो, फलटण

न्यायालय येथे रिमांड रिपोर्टसह हजर ठेवले असता त्याची 14 दिवस न्यायालयीन अभिरक्षा मंजुर

झालेली आहे.

सदरची कारवाई ही मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. आचल

दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग

यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री सुशिल भोसले सहा. पोलीस

निरीक्षक, पोहवा संतोष नाळे, पोहवा. नितीन भोसले, पोना बापु मदने, पोकॉ. विठठल काळे, पोकॉ.

अभिजित घनवट यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments