Type Here to Get Search Results !

माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हाती तुतारी ?

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हाती तुतारी ?


माढा लोकसभा मतदारसंघात अजून उमेदवारीचा पेच कायमच असताना शिरूर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अकलूज येथे  शिवरत्न बंगल्यावर महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील ,धैर्यशील मोहिते पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन राजकीय समीकरण बदलण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची चर्चा झालेली दिसत आहे.




महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री श्री. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार श्री. रणजितसिंह मोहिते पाटील, श्री. धैर्यशील मोहिते पाटील व समस्त मोहिते पाटील कुटुंबीयांनी अत्यंत आपुलकीने स्वागत केले. 

सर्वांसोबत संवाद साधून महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय परिस्थितीबाबत "सकारात्मक" चर्चा झाली ! अशी प्राथमिक माहिती शिरूर मतदार संघाचे विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिली

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121



Post a Comment

0 Comments