Type Here to Get Search Results !

झणझणे सासवड व देऊर गावच्या हद्दीत अफू ह्या अमली पदार्थ झाडाची लागवड करणारे 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

झणझणे सासवड व देऊर गावच्या हद्दीत अफू ह्या अमली पदार्थ झाडाची लागवड करणारे 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात.


स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई

लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील सासवड (झणझणे) गावचे हद्दीत व वाठार पोलीस स्टेशन हद्दीत देऊर गावचे

हद्दीत अफु झाडे या अंमली पदार्थाची लागवड करुन त्याची जोपासना करीत असले २ आरोपींना ताब्यात

घेवून त्यांचेकडून २२,८३,४०० /- रुपये किंमतीचा ११४.१७४ किलो ग्रॅम अफु झाडे जप्त.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा

यांनी अंमली पदार्थ लागवड, वाहतूक करणारे इसमांचे विरुध्द कारवाया करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक

अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत.

पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक

विश्वास शिंगाडे व सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचे

अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांची २ पथके तयार करुन त्यांना सातारा

जिल्हयातील अंमली पदार्थ अफु झाडे लागवड करणाऱ्या इसमांची माहिती प्राप्त करुन त्यांचेवर कारवाई

करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

दि.०४/०३/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत

माहिती प्राप्त झाली की, सासवड (झणझणे) ता. फलटण जि. सातारा येथील एका इसमाने पट्टीचा मळा

नावचे शेतात तसेच देऊर ता. कोरेगाव जि. सातारा येथील एका इसमाने जातेखन नावचे शिवारातील

शेतामध्ये स्व:ताच्या अर्थिक फायदयासाठी अफु या अंमली पदार्थाचे झाडांची लागवड करुन त्यांची जोपासना

करीत आहेत. त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व रोहित फार्णे यांना पथकासह

नमुद ठिकाणी जावून प्राप्त माहितीमधील इसमांना ताब्यात घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्याप्रमाणे सपोनि सुधीर पाटील व पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे पथकाने देऊर ता. कोरेगाव येथे

जाऊन मिळाले बातमीतील इसमास ताब्यात घेऊन त्याचे शेतातुन ४,६६,९०० /- रुपये किंमतीची २३.३४५

कि.ग्रॅम अंमली पदार्थ अफु झाडे हस्तगत करुन त्यांचेविरुध्द वाठार पोलीस ठाणे गु.र.नं. ५४/२०२४

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियम १९८५ चे कलम ८

(क), १८ (क) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तसेच सपोनि रोहित फार्णे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील

यांचे पथकाने सासवड (झणझणे) ता. फलटण येथे जाऊन लोणंद पोलीस ठाणेकडील सपोनि श्री सुशिल

भोसले व अंमलदार यांचे मदतीने नमुद इसमास ताब्यात घेऊन त्यांचे शेतातुन १८,१६, ५८० /- रुपये किंमतीची

९०.८२९ किलो ग्रॅम अंमली पदार्थ अफु झाडे हस्तगत करुन त्यांचेविरुध्द लोणंद पोलीस स्टेशन गु.र.नं.

१०१/२०२४ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियम १९८५ चे

कलम ८ (क), १८ (क) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी सदर दोन्ही

कारवाई मध्ये एकुण २२,८३,४००/- किंमतीची ११४.१७४ कि. ग्रॅम वजनाची अंमली पदार्थ अफुची झाडे जप्त

केली आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेने माहे नोव्हेंबर २०२२ पासून गांजा, गांजाची झाडे व अफुची झाडे असे

एकूण ११ कारवाई करुन १,८७, ७७, ५८०/- रुपये (एक कोटी, सत्याऐंशी लाख, सत्यात्तर हजार,

पाचशे ऐंशी रुपये) किमतीचा ७७५.२६० किलो ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा, गांजा झाडे व

अफु झाडे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा

यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित

फार्णे, सुशिल भोसले, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, विशाल कदम, तानाजी माने,

पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले,

मंगेश महाडीक, सचिन साळूंखे, लैलेश फडतरे, मुनीर मुल्ला, प्रविण फडतरे, अमोल माने, शिवाजी भिसे,

अरुण पाटील, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, अमित माने, स्वप्निल कुंभार, मनोज जाधव, प्रविण कांबळे,

मोहन पवार, ओंकार यादव, स्वप्निल दौंड, रोहित निकम, पृथ्वी जाधव, सचिन ससाणे, प्रविण पवार, केतन

शिंदे, वैभव सावंत, धीरज महाडीक, अमोल जाधव, अमोल निकम, तसेच लोणंद पोलीस ठाणेकडील

पोलीस अंमलदार नितीन भोसले, अतुल कुंभार, सतिश दडस, बापुराव मदने, संजय चव्हाण यांनी सदरची

कारवाई केली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक

सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments