Type Here to Get Search Results !

गिरवी मध्ये मेंढ्या चारण्याच्या कारणावरून महीलेस मारहाण.

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/ वैभव जगताप 

गिरवी मध्ये मेंढ्या चारण्याच्या कारणावरून महीलेस मारहाण.


 दि.4/3/24 रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास मौजे गिरवी ता.फलटण जि.सातारा येथील वाघजाई तलाव नावाच्या शिवारात स्वाती गणेश मदने वय वर्ष 30 रा.गिरवी, जननी मळा वाघजाई तलाव, हिने मधुकर मोतीराम मदने रा. गिरवी यास आमच्या क्षेत्रामध्ये मेंढ्या चारु नकोस असे म्हटल्यामुळे मधुकर मोतीराम मदने यांने रागाला जाऊन  मला शिवीगाळ करून दमदाटी करून हातातील कळकाच्या काठीने माझ्या डोक्यात व कानाच्या वर काठी मारल्यामुळे पाच टाके पडले आहेत व पाठीवर मुक्का मार लागला आहे अशी फिर्याद स्वाती गणेश मदने हीने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन दिलेली आहे.

 सदर घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी भेट देऊन  घटनेची सत्यता पडताळून कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले आहे तरी या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार एक्के हे करत आहेत.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments