सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
सातारा जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदे अंतर्गत 56 उद्योजकांकडून-1 हजार 150 कोटींचे सामंजस्य करार.
सातारा, दि. 12 : मॅग्नेटिक महाराष्ट्र 2024 साठी ची पूर्व तयारी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदे अंतर्गत सातारा जिल्ह्यात छोटया उद्योजकांपासून मोठया उद्योजकांनीही गुंतवणुक करण्याकरिता पुढाकार घेतला. परिषदेमध्ये एकूण 56 प्रस्तावित उद्योगातून 1 हजार 150 कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या गुंतवणुकीतून सातारा जिल्ह्यात भविष्यात 2 हजार 800 नवीन रोजगार निर्मिती होणार आहे.
मास भवन विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी श्री.जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद मास भवन, सातारा येथे संपन्न झाली. यावेळी पुणे विभागाचे सहसंचालक शैलेश राजपूत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ मास अध्यक्ष राजेंद्र मोहिते, मास सचिव धैर्यशील भोसले उपस्थीत होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, सातारा जिल्ह्यातील उद्योग वाढीसाठी आवश्यक त्या पायाभूत सोयी सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. औद्योगीक दृष्ट्या अविकसित भागात उद्योजकांनी गुंतवणूक करावी असे आवाहन त्यांनी केले.
सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटन क्षेत्रातही मोठ्या रोजगाराच्या मोठ्या संधी असून त्याकडे जिल्ह्यातील उद्योजकांनी एक संधी म्हणून पाहावे. त्याबरोबरच उद्योगांना कोणतीही मदत आवश्यक असल्यास जिल्हा प्रशासन सदैव तत्पर आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी सांगितले.
या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदे विविध उद्योजक, प्रतिनिधी उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments