सह्याद्री निर्भिड न्यूज
महाबळेश्वर/चैतन्य दवे
दारूचे सेवन करून दारू ची वाहतूक करणारे पर्यटकावर महाबळेश्वर पोलीस स्टेशन कडून गुन्हा दाखल .
महाबळेश्वर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १२/०३/२०२४ रोजी मौजे मांघर ता. महाबळेश्वर गावचे
हदिदत महाबळेश्वर ते मांघर जाणारे रोडवर महाबळेश्वर पोलीसांकडून पेट्रोलींग करीत असताना एक ईटिंगा
कार क्र. एमएच १२ व्हीजी ५४८० चा संशय आलेने सदर गाडी थांबवून तीची तपासणी करता कार चालक
इसम नामे हर्षल महेंद्र सिंधनकर रा. जयभवानीनगर, कोथरूड पुणे हा दारूचे सेवन करून गाडी चालवित
असताना मिळून आला. सदर कारची तपासणी करता मागील सिटवर दोन विदेशी दारूच्या बाटल्या मिळून
आल्या आहे. सदर बाबत कारचालक व त्याचे सोबत असणारा इसम रामचंद्र सुभाष मानिक रा. उदना पोस्ट
बालीपुर ता. हुगळे रा. प.बंगाल यांचेविरूदध मुंबई दारूबंदी अधिनियम कायदा क. ६५ ई सह ८३ अन्वये
गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाईत ईटिंगा कार सह विदेशी दारू असा एकुण १०,०१,८००/- रू.
किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक यशवंत नलावले यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा/७१७ किरण
पोकॉ/१२६ जांभळे, चापोहवा/९८० अंकुश पोळ यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोहवा/
१०८४ शेलार महाबळेश्वर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
चव्हाण,
महाबळेश्वर पोलीस स्टेशनकडून हदिदत पर्यटकनाकरीता येणारे पर्यटकांना मदयाचे सेवन करून
वाहन न चालविणेबाबत अवाहन करण्यात आले आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments